Online Digital Payment : असं म्हणतात कि नाण्याच्या दोन बाजू असतात, आणि दोन्ही बाजू एकमेकांपेक्षा विरुद्ध आणि वेगळ्या असतात. हीच परिस्थती आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटकाला लागू होते. एखादं यंत्र किंवा वस्तू हातात घेतलं कि समजून जावं याला फायदे आणि तोटे दोन्ही जोडलेले आहेत. बदलणाऱ्या तांत्रिक जगालाही हाच नियम लागू होतो. आपण म्हणतो कि यंत्राच्या सहायाने आणि तांत्रिकी बदलांमुळे आयुष्य फारच सोपं झालं आहे, आणि होऊ शकणाऱ्या वाईट परिणामांची चिंता न करता डोळे बंद करून त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत अवलंबून राहतो. सध्या डिजिटल पेमेंटचा बोलबाला वाढलाय आणि सोबतच या क्षेत्रात घडणारे गुन्हे देखील वाढले आहेत. तुम्ही देखील आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं पहिली असतील, आज यावर थोडी सविस्तर माहिती जाणून घेऊया…
ऑनलाईन गुन्हे रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न: (Online Digital Payment)
कदाचित बदलणाऱ्या जगासोबत गुन्हेगार गुन्हेगारीचे मार्ग देखील बदलत असावेत. पण आपलं सरकार यावर वेळेत लगाम घालण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आता दोन व्यक्तींमध्ये होणाऱ्या आर्थिक देवाण- घेवाणीवर किमान वेळेची मर्यादा लावली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या व्यवहाराची मर्यादा 4 तास अशी निश्चित केली जाऊ शकते. यामुळे डिजिटल पेमेंट करताना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला तरी देखील वाढत्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी हे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये IMPS, RTGS आणि UPI अश्या साधनांचा समावेश केला जाऊ शकतो.
सध्या UPIचा वापर करून ऑनलाईन पेमेंट करताना 24 तासांमध्ये केवळ 5 हजार रुपयांपर्यंत व्यवहार करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच नेशनल इलेक्ट्रोनिक फंड ट्रान्स्फरचा वापर करून पैसे पाठवणार असाल तर यामध्ये 50 हजार रुपयांची मर्यादा लागू होते. मात्र आता येणारे नवीन नियम यापेक्षा काहीसे वेगळे असणार आहेत, 2 हजार रुपयांपेक्षा अधिक व्यवहारांसाठी आता 4 तासांचा विंडो लागू केला जाईल. याचाच अर्थ असा कि व्यवहार केल्यानंतर त्यात फेरबदल करण्यासाठी तुम्हाला 4 तासांची मुदत दिली जाईल. 2 हजार रुपयांपेक्षा कमी आर्थिक व्यवहारांमध्ये जास्ती वेळ खर्च होऊ नये म्हणून तिथे हा नियम (Online Digital Payment) लागू होणार नाहीत.
डिजिटल पेमेंटचे गुन्हे वाढतायत:
सर्वोच्य बँकने जारी केलेल्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2022-2023 या काळात देशात सर्वात अधिक डिजिटल पेमेंटच्यासंदर्भात(Online Digital Payment) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. वर्ष 2023मध्ये या गुन्ह्यांचा आकडा 13,530 वर येऊन पोहोचला होता, ज्यात एकूण 30,252 कोटी रुपयांची चोरी उघडकीस आली. या चोऱ्या ऑनलाईन ट्रान्स्फरच्या वेळी झाल्या असल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे.
परिस्थती दिवसेंदिवस गंभीर होत आहे आणि वाढते गुन्हे लक्ष्यात घेता आपण पूर्णपणे सरकारवर अवलंबून राहू शकत नाही. आता आपण स्वतःच आर्थिक व्यवहारांची जबाबदारी घेतली पाहिजे. अगदी सहज सोप्या गोष्टींची अंमलबजावणी करत तुम्ही वाढत्या गुन्हेगारीपासून स्वतःचे रक्षण करू शकता. जसे कि, कुठल्याही अनोळखी व्यक्तीचा फोन घेऊ नका, कोणीही तुम्हाला जर का बँक आणि पैश्यांच्या बापतीत काही खासगी माहिती द्यायला सांगत असेल तर अश्या माणसांपासून वेळेतच दूर राहा, आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या पासवर्डची माहिती कोणासोबत शेअर करू नका. यामुळे गुन्हे थांबणार नाहीत पण काही अंशी त्यावर आळा घातला जाण्याची शक्यात नक्कीच आहे.