बिझनेसनामा । Myntra ही एक भारतीय फॅशन ई-कॉमर्स कंपनी होती. या कंपनीचे मुख्यालय कर्नाटक मधील बेंगळुरू येथे आहे. या कंपनीकडून पुरुष आणि महिलांचे कपडे, एक्सेसरीज, शूज आणि फॅशनशी संबंधित अनेक उत्पादनांची विक्री केली जाते. आयआयटी कानपूरमधून पदवीचे शिक्षण घेतलेल्या आशुतोष लावनिया आणि विनीत सक्सेना यांच्यासह मुकेश बन्सल यांनी या कंपनीची स्थापना केली आहे. हे लक्षात घ्या कि, मे 2014 मध्ये या कंपनीकडून पर्सनल गिफ्ट्सची विक्री केली जाते असे. मात्र नंतर Flipkart ने 2,000 कोटी डॉलर्समध्ये ही कंपनी विकत घेतली. टायगर ग्लोबल आणि एक्सेल पार्टनर्स या दोन मोठ्या भागधारकांद्वारे ही खरेदी केली गेली.
आता Myntra एक फ्रीस्टँडिंग कंपनी आहे, जी स्वतंत्रपणे काम करू शकते. तसेच Myntra फ्लिपकार्टच्या मालकीखाली ऑफ-ब्रँड सेट करत आहे आणि फॅशन ग्राहकांसाठी काम करू शकते. 2014 पासून, Myntra कडे 1000 हून जास्त ब्रँडची सुमारे 1,50,000 उत्पादने आहेत, ज्यामध्ये भारतातील 9000 पिन कोडचे वाटप आहे.
वेबसाइट बंद करण्याचा निर्णय आला अंगलट
पुढे 2015 मध्ये जेव्हा अनंत नारायणन हे Myntra चे CEO बनले. तेव्हा Myntra कडून घोषणा करण्यात आली की, ते आपली वेबसाइट बंद करून फक्त मोबाइल ऍप्लिकेशनद्वारेच काम करेल. त्यामुळे त्यांनी आपली वेबसाइट बंद करून मोबाईल किंवा स्मार्टफोनवर ऍप्लिकेशन सुरू केले. यावेळी सर्वाधिक ट्रान्सझॅक्शन आणि खरेदी ही ऍप्लिकेशनद्वारेच करण्यात आली. मात्र कंपनीचा हा निर्णय चुकीचा ठरला आणि परिणामी विक्रीमध्ये 10% घट झाली.
यानंतर फेब्रुवारी 2016 मध्ये, “app-only” मॉडेलच्या अपयशाची कबुली देत Myntra कडून आपली वेबसाइट नवीन डिझाइनसह रीस्टार्ट घोषणा करण्यात आली. 2021 मध्ये, Avesta Foundation नावाची NGO चालवणाऱ्या नाझ पटेल या महिलेच्या पोलिस तक्रारीनंतर Myntra कडून आपला लोगो बदलण्यात आला. आपल्या तक्रारीत हा लोगो एका ‘नग्न स्त्री’ सारखा दिसत असून तो बदलला पाहिजे असे या महिलेने सांगितले.
अशा प्रकारे मिळविली गुंतवणूक
गेल्या काही वर्षांत Myntra ने बाजारावर मजबूत पकड मिळविली आहे. ऑक्टोबर 2007 मध्ये, Myntra ने Erasmic Venture Fund (आता ते Accel Partners म्हणून ओळखले जाते) साशा मिरचंदानी, मुंबई एंजल्स आणि इतर काही गुंतवणूकदारांकडून सुरुवातीला फंड घेतला. तसेच NEA-Indo US व्हेंचरमधूनही जवळपास 50 लाख डॉलर्स जमा केले. यानंतरही त्यांनी अनेक गुंतवणूकदारांसोबत काम केले.
कर्मचाऱ्यांची समस्या
2011 ते 2021 पर्यंत Myntra ने अनेक चढ-उतार पाहिले. 2011 मध्ये, Myntra ने पर्सनलायझेशनपासून दूर जात लाईफस्टाईलचे फॅशन प्रॉडक्ट्स विकण्यास सुरुवात केली. Myntra सुरू करताना कर्मचाऱ्यांच्या समस्यांचाही सामना करावा लागला आहे. बेसिक एम्प्लॉयी बेनेफिट आणि कमी वेतनामुळे कर्मचारी संपावर गेले होते. यानंतर 2017 मध्ये वाटाघाटी करत Myntra ने आपले ऑफलाइन स्टोअर सुरू केले. यावेळी त्यांना $151.20 कोटीचा निव्वळ तोटा झाला.
रिएलिटी फॅशन शो
नवीन फॅशनआणि डिझाईनला चालना देण्यासाठी Myntra कडून एक डिजिटल रिएलिटी फॅशन शो आयोजित केला आहे. “MYNTRA FASHION SUPERSTAR” हा फॅशनवर आधारित टॅलेंट हंट शो 17 सप्टेंबर 2019 रोजी Myntra ऍप्लिकेशनवर आला होता.
हा शो झूम स्टुडिओमध्ये तयार करण्यात आला. या शोसाठी बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा प्रमुख जज म्हणून आली होती. आता Myntra ने आपल्या वेबसाइट सर्व वयाच्या लोकांसाठी अनेक प्रॉडक्ट्स आणले आहेत.