Online Gaming Taxation : ऑनलाईन गेमिंग कंपन्यांच्या 1 लाख कोटींची नोटीस; नेमकं काय आहे प्रकरण?

Online Gaming Taxation : देशात ऑनलाईन गेमिंगच प्रमाण बराच वाढलेलं आहे, या गेमिंग मध्ये केवळ तरुण वर्गाच नाही तर त्याही पुढची लोकं आनंदाने आणि उत्साहाने भाग घेताना दिसतात. आज याच चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना आता 1 लाख करोड रुपयांची कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. यामागील नेमकं कारण काय आहे आणि या कंपन्यांविरुद्ध एवढी मोठी कारवाई का करण्यात आली? हे आज आपण जाणून घेऊया.

ऑनलाईन गेमिंग कंपन्यांविरुद्ध नोटीस: Online Gaming Taxation

अलीकडेच ऑनलाईन गेमिंग कंपन्यांविरुद्ध एक नोटीस जारी करण्यात आली आहे. सुमारे 1 लाख कोटी रुपयांची GST चोरी केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. समोर आलेली माहीतीनुसार 1 ऑक्टोबर पासून फॉरेन गेमिंग कंपन्यांचा यात कितपत समावेश आहे याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. GST अधिकाऱ्यांकडून हि नोटीस जारी करण्यात आली आहे, आता भारत सरकार कडून गेमिंगच्या कायद्यात काही विशेष बदल करण्यात आले असून विदेशी कंपन्यांना इथे व्यवसाय सुरु करण्यासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे, याआधी म्हणजेच ऑगस्ट महिन्यात आहे स्पष्ट करण्यात आले होते कि ऑनलाईन गेमिंगच्या बेट्स वर 28 टक्क्यांचा GST लावला जाईल.

कोणाच्या विरुद्ध नोटीस?

देशातील प्रसिद्ध गेमिंग कंपन्या जसे कि Dream11, Delta Corp यांसारख्या कंपन्यांच्या नावे GST कर भरलेल्याचा पुरावा (Online Gaming Taxation) दाखवण्याची नोटीस निघाली आहे. हर्ष जैन यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या Dream11 या गेमिंग कंपनीच्या नावे तब्बल 25,000 कोटींपेक्षा अधिक रुपयांची GST नोटीस पाठवण्यात आली आहे. हि देशातील सर्वात मोठी इनडायरेक्ट टेक्स नोटीस म्हणावी लागेल. गेल्यावर्षी असेच एक प्रकरण उघडकीस आल्यानंतर GamesKraft नावाच्या कंपनीविरोधात 21,000 करोड रुपयांची GST चोरी प्रकरणाची नोटीस जरी करण्यात आली होती, मात्र यावेळी कर्नाटक राज्य सरकारचा कंपनीला पूर्ण पाठींबा होता.