Online Payment करताना बँकेतून पैसे कट झाले, परंतु पुढच्या माणसाला गेलेच नाहीत तर काय करावं?

Online Payment: हल्ली सगळेच व्यवहार पैश्यांशिवाय केले जातात, म्हणजे काय तर सगळाच व्यवहार डिजिटल झाला आहे. भाजी विकत घेण्यापासून ते दुसऱ्या राज्यात पैसे पाठवणे आता काही मिनिटांचा खेळ बनला आहे. क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, UPI आणि इतर माध्यमांचा वापर करून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय व्यवहार केले जातात. पण कधीकधी काय होतं ऑनलाईन पैश्यांचा व्यवहार करताना तो अयशस्वी होतो पण तरीही बँकमधून पैसे कापले जातात .. असं का? आणि असं झाल्यास काय करावं हे आता जाणून घेऊया.

Online Payment अयशस्वी का होते?

भारतात ऑनलाईन व्यवहार झपाट्याने वाढत आहेत आणि म्हणूच अनेक आंतरराष्ट्रीय वेबसाईटस भारतात उत्पादने पुरवत आहेत. अनेकवेळा ऑनलाईन व्यवहार करताना काय होतं कि पैसे तर खात्यातून कापले जातात पण व्यवहार यशस्वी होत नाहीत. आणि समोरच्या व्यक्तीला पैसे पोचत नाहीत. यामागे अनेक करणे आहेत. यातील सर्वात महत्वाचं कारण म्हणजे रिझर्व बँकच्या डेबिट (Debit) आणि क्रेडीट(Credit) नियमांनुसार जर का एखादी आंतरराष्ट्रीय वेबसाईट RBIच्या नियमांमध्ये बसत नसेल तर ती भारतीय डेबिट किंवा क्रेडीटचा स्वीकार करू शकत नाही. किंवा अनेक आंतरराष्ट्रीय संकेतस्थळांवर काही बंधने आहेत ज्यामुळे अनेककदा पेमेंट पूर्ण होऊ शकत नाहीत. या व्यतिरिक्त कारण म्हणजे नेटवर्कचा प्रॉब्लेम, OTP प्रॉब्लेम किंवा इतर समस्या असू शकतात. अनेवेळा ग्राहकांच्या सुविधेसाठी आणि त्यांना फसवणूकीपासून वाचवण्यासाठी बँका आर्थिक व्यवहारांना परवानगी देत नाहीत(Online Payment).

अश्यावेळी काय करावं?

रिझर्व बँक सांगते कि पाच दिवसांत (5 Working Days) हे पैसे लोकांच्या खात्यात पुन्हा पाठवले जातात. तसे न केल्यास बँकला ग्राहकाच्या खात्यात दररोज 100 रुपये जमा करावे लागतील. आंतरराष्ट्रीय पेमेंटमध्ये जर का काही अडचणी आल्याच तर SWIFT सेवेचा वापर करता येतो किंवा Skrill सारखे अँप उपलब्ध आहे, ज्यांचा वापर करून थेट आंतरराष्ट्रीय बँकसोबत बोलणी करता येतात. तुम्ही जर का असा त्रास सहन केला असेल तर घाबरून न जाता वर दिलेल्या गोष्टींचे पालन करावे, या सूचना जर का खूपच कठीण वाटत असतील तर प्राथमिक स्टेप म्हणून आपल्या बँकशी संपर्क करावा.