Online Payment Without Internet : नाद खुळा!! आता ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही; गुगलने आणली नवीन सिस्टम

Online Payment Without Internet : आपला भारत देश जगाच्या पाठीवर UPI चा वापर करून आर्थिक व्यवहार करीत असल्याने नेहमीच चर्चेत असतो. मात्र या UPI पेमेंटसाठी व्यवस्थित इंटरनेट कनेक्शनची असण्याची गरज असते. अनेक वेळा आर्थिक व्यवहार करत असताना कमी इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे सोसावा लागलेला त्रास तुम्ही नक्कीच अनुभवलेला असेल. मात्र कधी इंटरनेट शिवाय होणाऱ्या आर्थिक व्यवहारांबद्दल माहिती मिळवली आहेत का? सध्या आपल्या देशात 5G इंटरनेट कनेक्टिव्हिटीच जोरदार वारं वाहत आहे, आणि अशातच कमी इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे काही ठिकाणी ऑनलाइन पेमेंट करण्यात अडचणी येत आहेत. ग्राहकांना अशा अडचणींपासून वाचवण्यासाठी गुगलने वॉलेटमध्ये वर्चुअल कार्ड जोडून नवीन सिस्टम सुरू केली आहे, या अनोख्या सिस्टमचा वापर करून तुम्ही इंटरनेट शिवाय देखील पेमेंट करू शकता….

आता इंटरनेट शिवाय करा ऑनलाईन पेमेंट: (Online Payment Without Internet )

भारतात सध्या 5G इंटरनेट कनेक्टिव्हिटीचं प्रमाण वाढताना दिसतंय, मात्र देशाच्या प्रत्येक भागात अजून ही सेवा पोहोचलेली नसल्यामुळे ग्राहकांना कित्येकदा इंटरनेट पेमेंटमध्ये येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो. आता गुगलने तांत्रिक घटकांचा पुरेपूर वापर करत ग्राहकांच्या हितासाठी बाजारात एक नवीन सिस्टम आणली आहे. हि नवीन सिस्टम प्रत्येक ग्राहकाला भरपूर फायदा करून देणार आहे. गुगलच्या या नवीन सिस्टम मध्ये इंटरनेट शिवाय ऑनलाइन पेमेंट करता येईल, आणि म्हणूनच आता इंटरनेटमुळे कोणतेही आर्थिक व्यवहार अडकून पडणार नाही.

इंटरनेट शिवाय पेमेंट कसं करावं?

गुगलने सादर केलेल्या या नवीन सिस्टममध्ये गुगल वॉलेटला वर्चुअल कार्ड पेमेंटशी जोडले जाईल. केवळ एकदाच इंटरनेटमध्ये जाऊन तुम्हाला कार्ड वॉलेटशी कनेक्ट करावं लागेल व यानंतर अनेक वेळा तुम्ही इंटरनेटविना पेमेंट करू शकता. कार्ड आणि वॉलेट एकमेकांशी जोडले गेल्यानंतर काही सोप्या पद्धतींचा अवलंब करून विना इंटरनेट (Online Payment Without Internet)पेमेंट करणे सहज शक्य आहे.

लक्षात घ्या की तुम्हाला मिळालेली आनंदाची बातमी हि इथेच सीमित होत नाही, ग्राहक स्मार्टफोन तसेच स्मार्ट वॉचचा वापर करून सुद्धा आता ऑनलाइन पेमेंट करू शकतात. मात्र इथे एक गोष्ट तुम्हाला कायम लक्ष्यात ठेवावी लागेल, ती म्हणजे इंटरनेट शिवाय पेमेंट करण्‍यासाठी तुमचा गुगल अकाउंट दोन दिवसांत किमान एकदा तरी इंटरनेटच्या संपर्कात येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. असे न झाल्यास गुगल वॉलेट वरून ऑनलाईन पेमेंट होणार नाही.

केवळ गुगलच नाही तर रिझर्व्ह बँकनेदेखील गेल्या आठवड्यात UPI Lite लाईट नावाची नवीन सिस्टम बाजारात आणली आहे. बँक कडून बनवण्यात आलेल्या या सिस्टममध्ये वापरकर्त्यांना UPI पिनचा वापर न करता लहान- सहान रकमेचा आर्थिक व्यवहार करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला गेलाय. अगदीच लहान रकमेच्या व्यवहारांसाठी बनवण्यात आलेली ही सिस्टम जवळपास पाचशे रुपयांपर्यंत UPI PIN शिवाय व्यवहार करण्याची संधी उपलब्ध करून देते.