बिझनेसनामा ऑनलाईन ।आजकाल ऑनलाइन ट्रांजेक्शनच्या (Online Payment) माध्यमातून ऑनलाइन पेमेंट करणं सर्वांनाच आवडतं. कोणत्याही दुकानात किंवा हॉटेलमध्ये जरी गेलो आणि खिशात पैसे नसले तरी आपण चिंता बाळगत नाही. कारण गुगल पे, फोनपे वरून आपण स्कॅन मारून किंवा नंबर वरून ऑनलाईन पेमेंट करतो. किंवा एखाद्या लांब राहणाऱ्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असले तरी आपण ऑनलाईन पेमेंट करून पैसे पाठवू शकतो. परंतु, बऱ्याचदा आपल्याकडून घाई गडबडीत चुकीच्या नंबरवर ट्रांजेक्शन केले जाते. आणि आपले पैसे अनोळखी व्यक्तीच्या अकाउंट मध्ये जमा होतात. अशा परिस्थितीत घाबरून न जाता आपण आपले पैसे परत मिळवू शकतो. त्यासाठी नेमकं काय करावं लागेल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
चुकीच्या खात्यात पैसे जमा झाल्यास हे काम करा – (Online Payment)
जर तुम्ही फोन पे, गुगल पे, पेटीएम या कोणत्याही ॲपच्या माध्यमातून पेमेंट केलं असेल तर तुम्हाला कस्टमर सर्विस वर जाऊन तक्रार करावी लागेल. त्याचबरोबर तुम्ही ज्या नंबर वर चुकून ट्रांजेक्शन केलेलं आहे (Online Payment) त्या नंबर वर कॉल करून तुमचे पैसे परत मागू शकतात. पण समोरच्या व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिल्यास तुम्ही आरबीआयच्या नियमानुसार बँकेकडे तक्रार करू शकता. त्याचबरोबर जर त्या व्यक्तीने ट्रांजेक्शन केलेले पैसे काढून घेतलेले असतील तर आरबीआय सोबतच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडे देखील तुम्ही तक्रार करू शकता. जर तुम्ही क्यू आर कोड ने ट्रांजेक्शन केलेलं असेल तर तुम्हाला बँकेत संपर्क करावा लागेल.
RBI कडे तुम्ही चुकीचा नंबर वर पैसे ट्रांजेक्शन (Online Payment) केल्याची तक्रार नोंदवण्यासाठी कोणतीही किचकट प्रोसेस नसून साधारण प्रोसेस ने जाऊन तुम्ही तुमचे पैसे रिफंड करू शकता. जर तुम्ही UPI वरून पैसे चुकीच्या नंबर वर ट्रांजेक्शन केले असेल त्यावेळी तुम्हाला 18001201740 या टोल फ्री नंबर वर कॉल करून तक्रार करावी लागेल. आणि सर्व डिटेल्स द्यावे लागतील. यानंतर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन एक फॉर्म भरून बँक अधिकाऱ्यांना द्यावे लागेल. यानंतर ते तुम्हाला एक रिक्वेस्ट नंबर किंवा कंप्लेंट नंबर देतील. त्याचबरोबर तुम्ही bankingombudsman.rbi.org.in या ईमेलवर सुद्धा तुमची तक्रार नोंदवू शकतात.