Online Shopping मध्ये वाढतेय फसवणुक; अशा प्रकारे घ्या काळजी

Online Shopping : खरेदीची आवड कोणाला नसते? ती तर सर्वानाच असते. आणि आता डिजिटल पद्धतींचा अवलंब केल्यामुळे बऱ्याच वस्तू सहज उपलब्ध होत आहेत. घराबाहेर पडून पायपीट न करता घर बसल्या आवडीच्या आणि आवश्यक वस्तूंची खरेदी करता येते. दिवसेंदिवस ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढतच चाललं आहे. मात्र ऑनलाईन शॉपिंग करत असताना फसवणुकीचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. त्यामुळे तुम्हाला काही खबरदारी घेणं आवश्यक आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा: Online Shopping

या क्षणी जशी खरेदी वाढणार आहे तशीच लोकांना लुबाडण्यासाठी अनेक लोकं दबा धरून बसलेली असणार आहेत, यांच्यापासून सुरक्षित राहत आपल्याला ऑनलाईन खरेदी करता आली पाहिजे. अशी लोकं तुम्हाला फसवण्यासाठी खोट्या वेबसाईटस तयार करतील, त्यामुळे विश्वास असलेल्या आणि अधिकृत साईटवरूनच खरेदी करावी. अनेकवेळा काय होतं कि पैसे वाचवण्याच्या नादात आपण चुकीच्या ऑफर्समागे जातो. पण इथे सुद्धा अशी अनेक माणसं आहेत जी मुद्दामून चुकीच्या ऑफर्स देऊन तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतील. अधिकाधिक कॅशबेक देणाऱ्या चुकीच्या साईटस पासून सावध राहा. अनेकवेळा तुम्हाला चुकीचे संदेश पाठवून लिंक सुरु करण्याची मागणी केली जाईल अश्या फिशिंग लिंकना वेळेतच ओळखा आणि त्यांच्यापासून सावध राहा.

कधीही ऑनलाईन खरेदी (Online Shopping) करताना कार्ड टोकनायझेशन वापरणे चांगले, इथे काय होतं कि तुमची माहिती ई-कॉमर्स विक्रेत्यापासुन सावध राहते. त्यामुळे अश्यावेळी वर्चुअल क्रेडीट किंवा डेबिट कार्डचा वापर करावा. कधीही फसवणूक रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे मजबूत पासवर्डचा वापर करणे, जेवढा मजबूत तुमचा पासवर्ड असेल हॅकर्स तुमच्या खात्यापर्यंत पोहोचायला जास्त कठीणाईचा सामना करावा लागेल. या काही महत्वाच्या गोष्टी कायम लक्ष्यात ठेवा आणि केवळ सणांच्या वेळीच नाही तर नेहमीच आपल्या खात्याची व पैश्यांची काळजी घ्या.