Online Trading: नवी मुंबईत 46 वर्षीय व्यक्तीने ऑनलाइन शेयर बाजारात 19 लाख रुपये गमावले. शुक्रवारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्यांनी त्याला ऑनलाइन शेयर बाजारात मोठा नफा मिळण्याचे आमिष दाखवले होते. याच प्रकारे दोन दिवसांपूर्वी नवी मुंबई पोलिसांनी 40 वर्षीय महिलेसोबत ऑनलाइन शेयर ट्रेडिंग फसवणुकीच्या प्रकरणात 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईमध्ये रहिवाश्याला लाखोंचा गंडा: (Online Trading)
खारघर येथील रहिवासी सुरेश बाबू इरोथ कुन्हिकन्नन नायर यांनी चार व्यक्तींविरोधात सायबर गुन्हेगारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, आरोपींनी नायर यांना ऑनलाइन शेअर बाजारात गुंतवणूक करून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले होते. नायर यांनी आरोपींना 19.36 लाख रुपये दिले, परंतु त्यांना कोणताही नफा मिळाला नाही. जेव्हा नायर यांनी आरोपींकडे विचारणा केली तेव्हा त्यांनी केलेल्या टाळाटाळीवरून नायर यांना फसवणूक झाल्याची जाणीव झाली.
सायबर गुन्हेगारी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी सांगितले की, आरोपींविरोधात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईमधून आणखीन एक गुन्हा घडकीस:
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने डिसेंबर 2023 पासून आरोपींच्या सांगण्यानुसार वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 1,92,82,837 एवढी मोठी रक्कम पाठवली मात्र, नंतर त्याला ते पैसे परत मिळाले नाहीत. महिलेने आरोपींना विचारले असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही(Online Trading). यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी नऊ जणांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.