Online Transaction OTP: ऑनलाईन व्यवहार करताना SMS द्वारे मिळणाऱ्या OTP चा वापर आपण सर्वजण करतो. पण आता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ऑनलाईन पेमेंट अधिक सुरक्षित बनवण्यासाठी नवीन योजनेवर काम सुरु केले आहे. सध्या, आपण ऑनलाईन खरेदी किंवा बिल भरणे यांसारख्या व्यवहारांसाठी OTP टाकतो. हा OTP आपल्या मोबाईल नंबरवर SMS द्वारे येतो. पण, याच OTP च्या माध्यमांमध्ये चोरी होण्याची शक्यता असते त्यामुळे, फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे.
OTP पेक्षा अधिक सुरक्षित पर्याय: (Online Transaction OTP)
आजकाल, ऑनलाइन व्यवहारांसाठी OTP (One Time Password) हा सर्वात सामान्य सुरक्षा उपाय आहे. मात्र, स्मार्टफोन चोरी, सिम स्वॅपिंग सारख्या घटनांमुळे OTP ही असुरक्षित बनू शकतात. त्यामुळे, OTP पेक्षा अधिक सुरक्षित पर्याय म्हणून Authenticator App आणि टोकन-आधारित प्रणाली विकसित होत आहेत. Authenticator App हे तुमच्या स्मार्टफोनवर एका टोकनचा वापर करून पासवर्ड जनरेट करतात. हे टोकन तुमच्या खात्याशी जोडलेले असते आणि ते OTP पेक्षा अधिक सुरक्षित मानले जाते (Online Transaction OTP). जगभरात फसवणुकीचे प्रमाण वाढलेले असतानाच हे नवीन तंत्रज्ञान आपली कशी काय मदत करेल हे पाहणं रंजक ठरणार आहे.