Online UPI Payments : आता 5 लाख रुपयांपर्यंत करू शकता ऑनलाईन पेमेंट; नववर्षात सरकारची जनतेला भेट

Online UPI Payments: बाकी अनेक क्षेत्रांप्रमाणे यावर्षी ऑनलाईन पेमेंटच्या क्षेत्रात सुद्धा आपल्याला आनंदाची बातमी मिळाली आहे. या वर्षाचा एकूण अंदाज घेतला तर सुरुवातीच्या महिन्यातच देशभरातील अनेक क्षेत्रांना खुशखबर मिळाली होती. आपण जगभरात UPI पेमेंट साठी ओळखले जातो, भारत विकासाच्या मार्गावर असला तरी देखील कॅशलेस बनत आपण जगासमोर एक वेगळंच उदाहरण ठेवलेलं आहे. टेक्नॉलॉजीचा उपयोग करून देशातील जनतेला कशाप्रकारे फायदा होऊ शकतो हे आपण इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून जगाला दाखवून दिलंय. अगदी रस्त्यावरच्या टपरी पासून ते थेट मोठमोठ्याला मॉल्समध्ये आज UPI चं साधन उपलब्ध आहे. याच UPI पेमेंटमुळे आपले अनेक व्यवहार सोपे झालेत, परिणामी माणसाचा वेळ वाचतोय आणि भारत देश देखील प्रगतीच्या मार्गावर कार्यरत आहे. तुम्हीही नक्कीच UPI पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही अजून एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. त्यानुसार तुम्ही आता 5 लाख पर्यंत बिनघोर व्यवहार करू शकता.

केंद्र सरकारने वाढवली UPI पेमेंट्सची मर्यादा: (Online UPI Payments)

देशात होणाऱ्या अधिकाधिक UPI पेमेंट्सची दखल घेता आता सरकारने ऑनलाइन पेमेंट करण्याची मुदत वाढवली आहे. एवढे दिवस आपण UPIचा अधिकाधिक वापर करत होतो पण त्यावर काही निर्बंध लावण्यात आले होते, परिणामी आपल्याला मर्यादेपेक्षा जास्ती रक्कम पाठवता यायची नाही. मात्र आता हे बंधन कायमचे हटणार असून केंद्र सरकारने याबाबतीत एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. आपल्या देशात एका दिवसात, एक लाख रुपयांपेक्षा अधिक व्यवहार ऑनलाइन पेमेंटद्वारे करण्यात येत नसत मात्र आता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI कडून ऑनलाईन पेमेंटची मर्यादा वाढवण्यात आली आहे. या निर्णयाला RBI चा पाठिंबा असल्याने आता आपण ऑनलाइन पेमेंटचा वापर करून पाच लाख रुपयांपर्यंत एकाच वेळी पैशांचा व्यवहार करू शकतो.

मात्र लक्षात घ्या की हा व्यवहार केवळ हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांच्या बाबतीत करण्याची अनुमती देण्यात आली आहे. हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्था या काही महत्त्वाच्या संस्था असल्याकारणाने केवळ पैशांच्या अडचणीमुळे इथे मिळणाऱ्या सुविधांपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय (Online UPI Payments). 10 जानेवारी 2024 पासून हा नवीन नियम लागू होणार असून यानंतर तुम्ही सर्व ठिकाणच्या शैक्षणिक संस्था तसेच हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी एकाच वेळी जास्तीत जास्त पाच लाख रुपयांचा वापर करू शकता. NPCIच्या या नवीन निर्णयाचा फायदा देशातील ऑनलाईन पेमेंट ॲप्स म्हणजेच पेटीएम (Paytm), गुगल पे (GooglePay) फोनपे (Phonepe) यांना होणार आहे. मात्र UPI पेमेंटच्या वापरकर्त्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागणार आहे ती म्हणजे आता वाढीव मर्यादेसह तुम्हाला पेमेंट मोड मध्ये UPI ला सक्षम करणे आवश्यक असेल कारण यानंतरच तुम्ही अधिकाधिक रकमेचा व्यवहार करू शकणार आहात.