Open AI Board Members : तांत्रिक जगात भली मोठी क्रांती घडवून आणणारी सेवा म्हणजे ChatGPT. यांची निर्मिती OpenAI कंपनीद्वारे करण्यात आली होती. आणि यामागे सॅम अल्टमन यांची फार महत्त्वाची भूमिका होती. काही कारणास्तव कंपनीने सॅम अल्टमन यांना घरचा रस्ता दाखवल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून OpenAI ही कंपनी चर्चांचा भाग बनली आहे. मधल्या काही दिवसात सॅम अल्टमन हे स्वतःची कंपनी सुरू करू शकतील अशाही चर्चांना वेग आला होता पण काल समोर आलेल्या बातमीप्रमाणे सॅम अल्टमन हे पुन्हा एकदा OpenAIचा भाग बनण्यासाठी तयार आहेत, कंपनीकडून त्यांना CEO पदी नियुक्त केले आहे. कंपनीचे अधिकारी बनल्यानंतर सेम अल्टमन यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या तीन सदस्यांची बोर्ड (Open AI Board Members) मधून हकालपट्टी करण्यात आली आहे…
सॅम अल्टमनना काढणाऱ्या तिघांची हकालपट्टी (Open AI Board Members ):
सॅम अल्टमन यांना OpenAI मधून बाहेरचा रस्ता दाखवला गेल्यामुळे अनेकांच्या मनात कंपनी विषयी निराशा पसरली होती. मात्र कंपनीने सॅम अल्टमन यांच्यासमोर आपली शस्त्र खाली ठेवलेले असून त्यांना CEO पदी नियुक्त करण्यात आले आहे आणि सॅम अल्टमन यांना बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या तीन अधिकाऱ्यांना कंपनीने निष्कासित केले असून, या तीन सदस्यांमध्ये हेलन टोनर, ताशा मॅकलॉकी आणि इलिया सुतस्केवर यांचा समावेश होतो आणि त्यांच्या जागी आता ३ नवीन बोर्ड मेंबर्सची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवीन बोर्ड मेंबर्समध्ये पहिलं नाव आहे ब्रेट टेलर, हे आता OpenAI कंपनीचे नवीन अध्यक्ष असतील, टेलर हे यापूर्वी X कंपनीमध्ये कार्यरत होते. टेलर यांच्यासोबतच बोर्ड मध्ये लॉरी समर्स आणि एम.डी एन्जिलो यांचा समावेश करण्यात आला आहे. समर्स हे अमेरिका सरकारचे ट्रेझरी सचिव होते, यासोबतच त्यांनी राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे डायरेक्टर म्हणून पद भूषवले आहे. एन्जिलो हे कोरा वेबसाईटचे सहसंस्थापक आणि CEO असून याआधी त्यांनी मेटाचे CEO म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.