Share Market : ‘या’ स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षात 1 लाखाचे झाले असते 9 लाख

बिझनेसनामा ऑनलाईन । शेअर बाजार म्हंटल कि यामध्ये चढ- उतार तर आलेच. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना कधी प्रॉफिट मिळतं तर कधी हाती निराशा येते. शेअर बाजारात कितीही घसरण झाली तरी असा कोणता ना कोणता शेअर असतोच जो आपल्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून देतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअर बद्दल सांगणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना 3 वर्षात चांगलंच मालामाल केलं आहे. यामध्ये जर तुम्ही फक्त 1 लाखाची जरी गुंतवणूक केली असती तर आज तुम्हाला 9 लाख रुपयांचा घसघशीत फायदा झाला असता. होय, आम्ही सांगत आहोत Optimus Infracom LTD या कंपनीच्या शेअर्सबाबत …

Optiemus Infracom LTD कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न मिळवून दिला आहे. या कालावधीत या कंपनीच्या एका शेअरची किंमत 23.95 रुपयांवरून 227.65 पोचली. म्हणजेच जर कोणत्याही गुंतवणूकदराने Optiemus Infracom LTD च्या शेअर्समध्ये 3 वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 9 लाख रुपये झाले असते. Optiemus Infracom LTD या कंपनीच्या नेट प्रॉफिट मध्ये यावेळी 508 टक्क्यांनी वाढ झाली असून गेल्यावर्षी याच तीन महिन्यात कंपनीचा नफा 2.83 कोटी एवढा होता. त्याचबरोबर या कंपनीच्या विक्रीत मार्च महिन्यात 75 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीमध्ये कंपनीचा नफा हा 17.22 कोटी रुपये एवढा आहे.

मात्र गेल्या 4 दिवसांपासून Optiemus Infracom LTD च्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचे दिसत आहे. काल सोमवारी, म्हणजेच 20 जून रोजी कंपनीचे शेअर्स 2.02 टक्क्यांनी घसरून 223.05 रुपयांवर बंद झाले. मात्र या घसरणीनंतरही Optiemus Infracom LTD च्या शेअर्सनी 1 महिन्यात 23 टक्‍क्‍यांहून अधिक रिटर्न आपल्या गुंतवणूकदारांना दिला आहे.

Optimus Infracom Limited ची स्थापना 17 जून 1993 रोजी झाली आणि शेअर बाजारात लिस्टेड असलेली ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनीकडे मोबाइल आणि दूरसंचार उत्पादनांचे व्यवस्थापन, वितरण आणि विपणन यासह 25 वर्षांपेक्षा जास्त मल्टी-डोमेन अनुभव आहे.