Pakistan Economy: पाकिस्तानच्या कमकुवत अर्थव्यवस्थेबद्दल आपण सगळेच जाणतो. त्यात सध्या पाकिस्तानमध्ये निवडणुकांची चर्चा सुरु असून निवडणुकीवर मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. सामान्य नागरिकांवर वीज आणि इतर प्रकारचे कर लादून सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जात असल्याने याच वाईट परिणाम सामान्य जनतेला भोगावा लागत आहे. कदाचित तुम्हाला माहिती असेल की पाकिस्तानच्या डोक्यावर सध्या IMF चे कर्ज असताना हा निर्णय त्यांच्यासाठी कष्टकरी ठरू शकतो.
इतिहासातील सर्वात महागडी निवडणूक: (Pakistan News)
पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या अंदाजानुसार, या निवडणुकीवर 42 अब्ज रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. हा खर्च गेल्या सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा 26 टक्के अधिक आहे. सुरक्षा आणि इतर खर्चही विचारात घेतल्यास, एकूण खर्च 49 अब्ज रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. या निवडणुकीचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल हे अद्याप स्पष्ट नाही मात्र काही तज्ञांचा असा विश्वास आहे की यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण येईल, तर इतरांचा असा विश्वास आहे की निवडणुकीमुळे आर्थिक वाढीला चालना मिळेल. हे निश्चित आहे की 2024 मधील पाकिस्तानची निवडणूक देशासाठी एक महत्त्वपूर्ण क्षण असेल. निवडणुकीचे निकाल पाकिस्तानच्या भविष्यातील दिशा ठरवतील.
पाकिस्तानमधील निवडणुकीचा खर्च:
पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारीपासून सार्वत्रिक निवडणुकांना सुरुवात झाली. या निवडणुकांसाठी 42 अब्ज रुपयांचे बजेट ठेवण्यात आले होते, जे 2018 च्या निवडणुकीपेक्षा 26 टक्के जास्त आहे आणि पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात महाग निवडणूक ठरली (Pakistan News). या निवडणुकीच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठा खर्च मतपत्रिकांची छपाई, सुरक्षेसाठी एजन्सी तैनात करणे आणि मतदान कर्मचाऱ्यांचे वेतन यावर करण्यात आला. आता निवडणुकीचे निकाल काय येतात आणि त्याचा पाकिस्तानच्या भविष्यावर काय परिणाम होईल हे पाहणे बाकी आहे.