Pakistan Economy: पाकिस्तानवर कर्जाचे सावट कायम; प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज

Pakistan Economy: कर्जबाजारी पाकिस्तानची स्थिती आपण सगळेच ओळखून आहोत, मधल्या काळात पाकिस्तानमध्ये मतदानाचा घाट घातला गेला, मात्र अजून पाकिस्तानच्या नवीन सरकारचं चित्र समोर आलेलं नाही. या पार्शवभूमीवर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर सध्याच्या घडीला सुमारे 81.2 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाकिस्तानचे हे कर्ज तब्बल 27 टक्क्यांनी वाढले आहे. वाढत्या कर्जाचा हा डोंगर आता नव्या सरकारसाठी नक्कीच मोठी डोकेदुखी ठरेल असं वाटतं. असं म्हणतात की गेल्या एका वर्षात देशाचे एकूण कर्ज आणि देणी 17.4 लाख कोटी रुपयांनी वाढली आहेत.

कर्जाची रक्कम 81.2 लाख कोटींच्या पार: (Pakistan Economy)

पाकिस्तानच्या आर्थिक चिंता वाढतच आहेत. पाकिस्तानच्या केंद्रीय बँकेने दिलेल्या माहितीनुसार, देशाचे एकूण कर्ज आणि देणी आता तब्बल 81.2 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे ही देणी 4.6 लाख कोटी रुपयांपर्यंत गेली आहेत. गेल्या डिसेंबरपासून पाकिस्तानचे कर्ज दररोज सरासरी 48 अब्ज रुपयांनी वाढत आहे. देशाची परिस्थिती एवढी खराब असताना या सरकारचे प्रमुख अन्वरुल हक कक्कर यांचे परदेश भ्रमण सुरूच असल्याने यावरून असे दिसते की, सध्याच्या सरकारला आर्थिक व्यवस्था सुधारण्याची काहीही चिंता नाहीये की काय!!

पाकिस्तानमध्ये येणाऱ्या कोणत्याही सरकारपुढे कर्जाचे डोंगर उभे राहणार हे नक्कीच, या कर्जाच्या ओझ्याखाली वाकलेली पाकिस्तानी अर्थव्यवस्था (Pakistan Economy) हा सुद्धा नवीन विषय नाही. पण सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, गेल्या 2022-23 या वर्षात देशावर असलेल्या कर्जाची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढली आहेत आणि म्हणूनच आता, प्रत्येक नागरिकावर जवळपास 271,624 रुपयांचे कर्ज आहे, जे फक्त एका वर्षात 25.2 टक्क्यांनी वाढलेय.