बिझनेसनामा ऑनलाईन । जर तुम्ही आधार कार्ड पॅनला लिंक केले नसेल आणि RTI टॅक्स भरलेला नसेल तर तुम्हाला खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. आयकर विभागाने 30 जूनपर्यंत ज्यांनी पॅन कार्ड आधार कार्डला लिंक केलेलं नाही, त्यांचं पॅन कार्ड इन ऑपरेटिव्ह केलं आहे. यामुळे टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीला 15 काम करता येणार नाही.
आयकर विभागाने वेबसाईटवर या 15 कामांची लिस्ट जारी केली. त्यानुसार टॅक्स पेयर 31 जुलै पर्यंत त्यांचा आयकर रिटर्न भरू शकणार नाही. कारण पॅन आधारला लिंक नसल्यामुळे इन ऑपरेट आहे. ते ऑपरेट करण्यासाठी 30 दिवस लागतील. त्याचबरोबर तुम्ही 31 जुलै नंतर टॅक्स भरला तर तुम्ही बिलेटेड आयटीआर या नावाने तो दाखल होईल. आणि तुम्हाला बिलेटेड फीस म्हणजेच आयटी टॅक्स वर पेनल्टी द्यावी लागेल. जो वर्षाला 5 लाख रुपये कमावणाऱ्यांना 5000 रुपये आहे. एवढंच नाही तर पॅन कार्ड ऍक्टिव्ह करण्यासाठी 1000 रुपये दंड सुद्धा द्यावा लागेल. म्हणजेच 6000 रुपये पेनल्टी तुम्हाला द्यावी लागेल.
काय करावं लागेल ?
पॅन कार्ड ऍक्टिव्ह करण्यासाठी 1000 रुपये पेनल्टी सोबत ऍथॉरिटीला आधार कार्ड बद्दल माहिती द्यावी लागेल.
त्यानंतर 30 दिवसांनी तुमचे पॅन कार्ड 30 दिवसांच्या आत ऍक्टिव्ह होईल. यासाठी पुढील प्रोसिजर फॉलो करावी लागेल.
आयकर ई-फायलिंग वेबसाईटवर जा.
तुमचे खाते लॉगिन करा. लॉग इन केल्यानंतर प्रोफाईल मध्ये जा.
त्यानंतर Link Pan With Adhar या ऑप्शन वर क्लिक करा.
यामध्ये आवश्यक माहिती भरा. यानंतर e- pay tax च्या माध्यमातून 1000 रुपये दंड भरा.
हा दंड Other payment म्हणून जमा केला जाईल.