PAN-Aadhar Link बाबत मोठी अपडेट; आयकर विभागाच्या ‘या’ नियमाचे उल्लंघन पडेल भारी

PAN-Aadhar Link: तुमच्या मनात घर खरेदी करण्याचा विचार सुरु आहे का? हो तर आजची हि बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची ठरणार आहे. कारण आयकर विभागाच्या नवीन नियमांनुसार तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड एक-मेकांशी लिंक्ड असणं त्यांना महत्वाचं आहे. आज आम्ही अश्या एका घटकाबद्दल अधिक माहिती देणार आहोत ज्याचा कदाचित विचार अनेकवेळा घर खरेदी करताना केला जात नाही. मात्र हीच तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते आणि याच्याच परिणामी तुम्हाला घर खरेदी करता येणार नाही. विशेष म्हणजे एखादी नवीन प्रॉपर्टी विकत घेताना काही कर भरावा लागतो आणि जर का तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी जोडलेलं नसेल तर या कराची रक्कम वाढेल.

आधार आणि पॅन कार्ड जोडून घ्या: (PAN-Aadhar Link)

सरकारी नियमांप्रमाणे तुम्ही जर की खादी नवीन प्रॉपर्टी विकत घेणार असाल तर त्यावर एक ठराविक रक्कम कर म्हणून भरावी लागते. हि मालमत्ता जर का 50 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तर त्यावर 1 टक्का TDS भरावा लागतो जो कि केंद्र सरकारच्या खात्यात जमा होतो आणि राहिलेली 99 टक्के रक्कम मालमत्तेची विक्री करणाऱ्या विक्रेत्याच्या नावे रुजू होते. पण जर का तुमच्याजवळ आधार आणि पॅन कार्ड लिंक्ड नसेल तर मात्र नवीन घर खरेदी करणं याशिवाय महाग अजून कुठलंही काम असणार नाही.

जर का तुमचं आधार आणि पॅन कार्ड लिंक्ड (PAN-Aadhar Link) नसेल तर TDS वाढून 20 टक्क्यांवर जाईल. पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत आता संपली आहे आणि अद्याप काहीही पाऊलं न उचलेल्या माणसांना आयकर विभागाकडून नोटीस यायला सुरुवात झालेली आहे. तसेच 50 लाखांपेक्षा अधिक मालमत्ता खरेदी करणाऱ्या लोकांना आयकर विभाग नोटीस पाठवली जातेय.

आयकर विभागाचा हा नियम कोणता?

आयकर विभागाच्या नियमाप्रमाणे कलाम 139AA च्या अंतर्गत इन्कम टेक्स रिटर्नमध्ये आधार आणि पॅन कार्ड एकमेंकांसोबत लिंक्ड (PAN-Aadhar Link) असणे अनिवार्य आहे. मात्र असा सरकारी नियम असून देखील कित्येक लोकं याचं पालन करत नाहीत, आणि सदर प्रकार आता आयकर विभागाच्या नजरेत आले आहेत. सरकारी नियमांचे पालन न करणाऱ्या सर्वांना विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली होती तसेच 31 मार्च 2020 पर्यंत दोन्ही कार्ड लिंक करून घेण्याची मुदतही देण्यात आली होती. विभागाकडून दिलेल्या मुदतीच्या काळात हि प्रक्रिया अगदी मोफत पूर्ण करून घेण्याचा मार्ग उपलब्ध होता. आता देखील आधार आणि पॅन कार्ड एकमेकांशी जोडता येते पण यासाठी 1000 रुपयांचे विलंब शुल्क भरावे लागते. हि एक सरकारी प्रक्रिया असल्यामुळे लवकरात लवकर तिचे पालन करा अन्यथा तुम्हाला कराची मोठी रक्कम भरावी लागेल.