Pani Puri Viral Video : आपण कोणाच्या हाताखाली नोकरी करावी की एखादा व्यवसाय सुरू करावा? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आजकाल अनेक तरुण मंडळी नोकरीपेक्षा व्यवसाय करण्यावर जास्ती भर देताना दिसतात. कारण त्यांच्यामते व्यवसाय सुरु करणं यात थोडाफार धोका असला तरी सुद्धा व्यवसायातून भरपूर पैसा कमावता येतो. मात्र जी मंडळी नोकरी करतात त्यांच्या म्हणण्यानुसार काही तास नोकरी केली की राहिलेला वेळ हा परिवारासोबत घालवता येतो किंवा स्वतःवर खर्च करता येतो. काही वर्षांचा अनुभव मिळाला कि नोकरीमधून देखील भरगोस पैसे कमावता येतात, त्यामुळे नोकरी करावी की व्यवसाय सुरू करावा हा वाद कधीच संपणार नाही. आज आम्ही तुम्हाला बाजारातील एक भन्नाट अशी बातमी देणार आहोत. सध्या बाजारात एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे जिथे रस्त्यावरचा एक पाणीपुरी विक्रेता त्याच्या कमाई बद्दल बोलताना दिसतो, या पाणीपुरी विक्रेत्याची कमाई जर का तुम्ही पाहिलीत तर नक्कीच तुमच्या भुवया आश्चर्याने उंचावतील.
पाणीपुरी विक्रेता नेमका म्हणतो तरी काय (Pani Puri Viral Video)
अनेक तरुण मंडळी फूड वलॉगिंग करतात, म्हणजे काय तर वेगवेगळ्या जागांना भेट देत तिथल्या विशेष पदार्थांची चव चाखून बघतात आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करतात. अशाच एका सोशल मीडियाच्या वापरकर्त्याकडून एक व्हिडिओ (Pani Puri Viral Video) सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आणि क्षणार्धात त्याने नेटकरी मंडळींना विचार करण्यास भाग पाडलं. या व्हिडिओत तो तरुण पाणीपुरीवाल्याला विचारतो की, “तुझी दिवसाची कमाई किती आहे?” यावर क्षणाचाही विचार न करता तो पाणीपुरीवाला “2500” असं उत्तर देतो. बरं तो इथेच थांबत नाही तर कधी कधी त्याला 500 ते 600 रुपये जास्ती मिळतात असेही म्हणतो.आपण जर का या पाणीपुरीवाल्याच्या मासिक उत्पादनाचा विचार केला तर तो दर महिन्याला किमान 75 ते 80 हजार रुपयांची कमाई करतोय
उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी सुद्धा फटक्यात 80 हजाराची नोकरी मिळणं या महागाईच्या काळात अत्यंत कठीण झालंय. दिवसभर इथून तिथे पायपीट करत फिरल्यानंतर कोणीतरी नोकरी देऊ करतो पण याचाच अर्थ शिक्षणाला साजेल असा पगार मिळेलच असंही नाही. आपल्या देशात असे कित्येक तरुण आहेत ज्यांना 20 हजार रुपये सुद्धा महिन्याला मिळत नाहीत त्यामुळे व्हिडिओ (Pani Puri Viral Video)पाहून अनेक मंडळी आश्चर्याने थक्क झाली आहेत.
हा व्हिडिओ vijay_vox_and college_arena या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला होता. आत्तापर्यंत त्याने चार कोटींपेक्षा अधिक लोकांचं लक्ष आकर्षित केलं आहे. या पोस्टवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गमतीशीर कमेंट्स देखील पाहायला मिळतील (Panipuri Viral Video). पाणीपुरीवाल्याची कमाई बघून प्रत्येक जणांच्या मनात आता ‘एवढं शिक्षण घेऊन काय फायदा झाला’ असाच प्रश्न फिरत असेल. कित्येक कॉर्पोरेटवाले तर महिन्याचा 75 हजार रुपयांचा पगार सुद्धा या पाणीपुरीवाल्या समोर फोल ठरलाय असं म्हणून प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.