Parag Desai Death : वाघ बकरी चहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे निधन

Parag Desai Death : गुजरातमधील प्रसिद्ध वाघ बकरी चहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन हेम्ब्रेजमुळे पराग देसाई याना रुग्णालयात भरती करण्यात आलं होते. अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये काढल्यानंतर तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. पराग देसाई यांच्या निधनाने वाघ बकरी कंपनीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पराग हे आपल्या घराजवळ मॉर्निंग वोल्कसाठी बाहेर पडले असता त्यांचा अपघात झाला, या अपघातामुळेच त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. प्राथमिक उपचारांसाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण प्रकृतीत काही बदल न झाल्याने त्यांना हेबतपूर रोडवरील दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. हॉस्पिटलच्या कर्मचारी वर्गाकडून अथक परिश्रम घेण्यात आले होते, मात्र पराग यांच्या गंभीर परिस्थितीसमोर शस्त्रक्रियेचा फायदा झाला नाही. त्यांचे काल म्हणजेच रविवारी संध्याकाळी निधन झाले, (Parag Desai Death) निधनापूर्वी सात दिवस त्यांची वेन्टीलेटरवर जीवन आणि मरणाशी झुंज सुरू होती.

कोण होते पराग देसाई? Parag Desai Death

पराग देसाई हे वाघ बकरी कंपनीच्या कार्यकारी संचालकाच्या पदावर काम करायचे. ते कंपनीचे चौथ्या पिढीतील उद्योजक होते. अमेरिकेच्या लाँग आयलँड विद्यापीठातून MBA केलेल्या पराग यांनी कंपनीचा नावलौकिक वाढवण्यात भरपूर कष्ट आणि मेहनत घेतली होती, वर्ष 1995 मध्ये कंपनीची असलेली उलाढाल आणि आज त्यात झालेला बदल यात भरपूर फरक पाहायला मिळतो. आज वाघ बकरी कंपनीची वार्षिक उलाढाल 2,000 कोटींपेक्षा अधिक आहे तसेच वाघ बकरी चहा भारतातील 24 राज्यांमध्ये आणि जगातील 60 देशांमध्ये निर्यात केला जातो.