Paras Share Price : इस्रोच्या यशस्वी मिशनमुळे ‘या’ डिफेन्स कंपनीचे शेअर्स तेजीत; गुंतवणूकदार झाले मालामाल

बिझनेसनामा ऑनलाईन । भारतीय शेअर मार्केट सध्या तेजीत असून अनेक शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना अगदी कमी वेळेत भरगोस नफा मिळवून देत आहेत. अशीच एक डिफेन्स कंपनी (Paras Share Price) जिने चंद्रयान -3 च्या यशामुळे मार्केटमध्ये शेअर्स चांगलेच वाढले आहेत. पारस डिफेन्स असं या शेअर्सचे नाव असून शेअरची किंमत ही मागील आठवड्यात 17% पेक्षा जास्त वाढून 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. भारताच्या चंद्र मोहिमेतील चांद्रयान 3 च्या यशानंतर एरोस्पेस आणि संरक्षण समभागांच्या उत्साहात पारस डिफेन्स शेअर्सनी बीएसईवर 52 आठवड्यांच्या उच्चांकी ₹ 841.80 वर तब्बल 17.3% ची झेप घेतली.

मागील तिमाहीत 61% पेक्षा जास्त YTD (Paras Share Price)

पारस डिफेन्स शेअरची किंमत गेल्या तीन महिन्यांत 61% पेक्षा जास्त आणि जवळपास 34% YTD वाढली आहे. गेल्या एका वर्षात स्टॉक 28% पेक्षा जास्त आहे. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील अनेक कंपन्यांपैकी एक आहे ज्यांनी चंद्र मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ला उपकरणे आणि साहित्य पुरवले आहे.

Q1 FY24 मध्ये कंपनीला 6 कोटींचा तोटा

Q1 FY24 मध्ये, कंपनीने (Paras Share Price) 6 कोटींचा निव्वळ तोटा नोंदवला, मागील वर्षीच्या याच तिमाहीत रु. 9 कोटी नफा होता. त्याचे एकूण उत्पन्नही गतवर्षीच्या 162 कोटी रुपयांच्या तुलनेत 133 कोटी रुपयांवर घसरले. Q०Q आधारावर, एकूण उत्पन्न Q1 FY24 मध्ये 47.9% घसरून 135 कोटी रुपयांवरून Q4 FY23 मध्ये 259 कोटी होते.