Parle G Girl Replaced : Parle G ने बदलला ‘त्या’ मुलीचा फोटो?? बिस्कीटच्या पुड्यावरील तो तरुण आहे तरी कोण?

Parle G Girl Replaced : पार्ले-जी बिस्किट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर केशरी आणि पिवळ्या रंगाच्या बिस्किट पॅकेटवर असलेल्या लहान मुलीचा चेहरा उभा राहतो, या मुलीला पार्ले गर्ल असं म्हणून ओळखलं जातं. मात्र सध्या हा चेहरा बदलून त्या जागी एका नवीन चेहरा जोडण्यात आला आहे. याबाबतची एक इंस्टाग्राम पोस्ट सुद्धा सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अनेक वर्षांपासून पार्ले गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलीचा चेहरा अचानक बदलला तरी कसा? यामागे नेमकं कारण तरी काय आहे? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ही बातमी सविस्तर नक्की वाचा…

पार्ले गर्लचा चेहरा अचानक का बदलला? Parle G Girl Replaced

बिस्किट म्हटलं की आजही अनेक लहान मुलांच्या तोंडी पार्ले-जी असंच नाव घेतलं जातं. पार्ले-जी ही बिस्किट भारतीय बाजारात किती मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे याची प्रचिती नमूद केलेल्या उदाहरणातून स्पष्ट होते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? की सोशल मीडियाच्या या बदलत्या जगात अचानक पार्ले-जी वरच्या मुलीचा चेहरा बदलण्यात आला आहे. आणि हा बदल स्वतः कंपनीकडून त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आल्याने ग्राहकांच्या मनात प्रश्नचिन्ह उभं झालंय. नवीन केलेल्या या बदलांमध्ये पार्ले गर्लच्या चेहऱ्याच्या जागी (Parle G Girl Replaced) एका इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरचा फोटो जोडण्यात आलाय, तसेच या बिस्कीटचे नाव सुद्धा पूर्णपणे बदलण्यात आले आहे. अचानक झालेल्या या बदलामुळे इंस्टाग्राम वर सर्वच नेटकरी या विषयाची जोरदार चर्चा करीत आहेत. वायरल होणारा हा फोटो सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर जेवरान जे बुन्शाह याचा आहे . इंस्टाग्राम वर फोटो बदलल्यानंतर बिस्कीटचे नाव देखील Bunshah-G असे बदलून लिहिण्यात आले.

काही दिवसांपूर्वी याच कंटेंट क्रियेटरने इंटरनेटवर एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या फॉलोवर्सला एक प्रश्न विचारला होता, ज्यात तो म्हणतो की, “तुम्ही एखादे दिवशी जर का पार्लेच्या मालकाला भेटलात तर तुम्ही त्यांना पार्ले सर, मिस्टर पार्ले का पार्ले जी म्हणून हाक माराल?” या व्हिडिओला अजून रंजक बनवण्यासाठी त्याने अनिल कपूर यांच्या राम लखन चित्रपटांमधील “ए जी, ओ जी” या गाण्याचा वापरही केला होता. सोशल मीडियाच्या या युगात कुठलीही अतरंगी गोष्ट क्षणार्धात एका मोबाईल वरून दुसऱ्या मोबाईलवर शेअर केली जाते. त्यामुळे भलं मोठं जगदेखील आता एका मुठीत येऊन बसलं आहे. हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तो बऱ्याच प्रमाणात गाजला आणि आता यावर उत्तर म्हणून पार्ले-जी कंपनीने सोशल मीडियाचा वापर करत बुन्शाह याला सडेतोड उत्तर दिले आहे.

कंपनीची पोस्ट होते आहे जोरदार व्हायरल:

जेवरान जे बुन्शाह कडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ जबरदस्त वायरल झाला. या व्हिडिओने केवळ त्याच्या चाहत्यांचच असं नाही तर थेट पार्ले-जी कंपनीचं लक्ष देखील व्हिडिओकडे आकर्षित केलं. या व्हिडिओला उत्तर देणं आता कंपनीसाठी भाग झालं असल्यामुळे नेटकर्‍यांच्या जगात ट्रेंडिंग असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून पार्ले-जी कंपनीने जेवरान जे बुन्शाह यांच्या नावे नवीन बिस्कीट तयार करत ती पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली (Parle-G Viral Post). सध्या हीच पोस्ट सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.

पोस्ट शेअर करत कंपनीने त्याला साजेश कॅप्शनही दिलं, कंपनी म्हणते कि, “पार्ले-जी कंपनीच्या मालकाला नेमकं काय म्हणून हाक मारावी असा प्रश्न पडला असेल, तर तुम्ही आम्हाला चहा सोबत ताव मारून खाण्यात येणारी बिस्किट असंच म्हणू शकता”. लक्षात घ्या की हा पोस्ट शेअर केला असला तरीही पार्ले-जी कंपनीने पार्ले गर्लला कोणासोबतही बदललेले (Parle G Girl Replaced) नाही. एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या मजेदार पोस्टला अतरंगी केवळ उत्तर म्हणून कंपनीकडून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.