Patanjali Foods : देशात पतंजलीच्या प्रोडक्टची चर्चा भरपूर सुरु आहे. मेड इन इंडिया या योजनेला धरून भारतीयांसाठी आयुर्वेदिक पद्धतींचा वापर करून या वस्तू तयार केल्या जातात. यात जीवनावश्यक सर्व गोष्टी सामावलेल्या असतात, असे कि साबण, शेम्पू, सौंदर्य साधने आणि भरपूर काही. पण तुम्हाला माहिती आहे का हि कंपनी आपल्या ह्याच व्यवसायातून भरपूर नफा कमावत आहे, पतंजली फुड्स हि त्यांचीच एक उपकंपनी असून हि FMCG ’ क्षेत्रासह कृषी प्रक्रिया उत्पादन क्षेत्राच्या अंतर्गत येते. कंपनीच्या बाजार मूल्यांत भरपूर वाढ झालेली आहे, आज आपण जाणून घेऊया याची कारणे आणि कंपनीबद्दल थोडक्यात…
Patanjali Foods किती कमाई करतेय : Patanjali Foods
पतंजली फुड्स हि कंपनी गेल्या वर्षीपासून नफ्यात आहे. कंपनीचे एकूण बाजारमूल्य 48,29,011.34 रुपये आहे. आता Patanjali Foods या कंपनीच्या वार्षिक महसुलात आता 31.04 टक्क्यांची वाढ झालेली असून आता नवीन किंमत 31,821.45 कोटी रुपये झाली आहे. आपण जर का मागच्या आर्थिक वर्षात डोकावून पाहिलं तर या क्षेत्राची सरासरी महसूलवाढ 12.27 टक्के होती. गेल्या वर्षभरात त्यांनी निव्वळ नफा 9.94 टक्क्यांनी वाढून 886.44 कोटी रुपयांवर नेऊन ठेवला होता. गेल्या आर्थिक वर्षात या क्षेत्राची निव्वळ नफ्यातील सरासरी वाढ 12.56 टक्के होती.
बाकी कंपन्यांच्या तुलनेत Patanjali Foods ची महसूल वाढ अधिक आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनीचा चार्ट पेटर्न इतरांच्या तुलनेत जास्ती मजबूत झाला आहे. सप्टेंबर 2022 ते मार्च 2023 मध्ये कंपनीचे शेअर्स मजबूत अपट्रेंड मध्ये पाहायला मिळत आहेत. हे चित्र पाहून येत्या काही दिवसांत कंपनी मोठा ब्रेकआउट देईल अशी अशा वाटते.