Patanjali News: रॉल्टा इंडिया ही कंपनी विकत घेण्यासाठी पतंजलीने दिली 830 कोटी रोख रक्कम

Patanjali News: मुंबईच्या National Company Law Tribunal (NCLT) ने कर्जात ग्रस्त रोल्टा इंडियासाठी पुन्हा बोली लावण्याची मंजुरी दिली आहे, ज्यामुळे बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीसाठी बोली लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पतंजलीने पुण्यातील आशदान प्रॉपर्टीजची 760 कोटी रुपयांची (Net Present Value – NPV) वर आधारित बोली सर्वोच्च ठरविल्यानंतर काही दिवसांनंतरच ही 830 कोटी रुपयांची रोख रक्कम देऊन बोली लावली आहे.

पतंजली विकत घेऊ पाहणारी कंपनी कोणती? (Patanjali News)

1989 मध्ये स्थापन झालेल्या रोल्टा इंडिया कंपनीने संरक्षण क्षेत्रासाठी GIS आणि भूसंपदा सेवा पुरवून नाव कमावला होता. पण ही स्वप्नवत वाटचाल अडचणींना सामोरी गेली. Bharat Electronics सोबत राखून संरक्षण खात्याने 50,000 कोटींहून अधिक रकमेचे ‘Battlefield Management System’ प्रकल्प राबवण्याची जबाबदारी 2015 मध्ये रोल्टाला दिली होती. मात्र, 2018 मध्ये हा प्रकल्प रखडला गेला, त्यामुळे रोल्टा कर्जात बुडाली.

कर्ज फेड न झाल्याने युनियन बँक ऑफ इंडियाने National Company Law Tribunal मुंबई येथे याचिका दाखल केली आणि सप्टेंबर 2018 मध्ये रोल्टा Insolvency कोर्टात पोहोचली. आजच्या घडीला रोल्टाचे सुमारे 14,000 कोटींचे कर्ज आहे. यापैकी युनियन बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकांच्या संघाला 7,100 कोटी आणि सिटिग्रुपच्या नेतृत्वाखालील परदेशी बॉण्डधारकांना 6,699 कोटी रुपये देय आहेत.

रोल्टा इंडियाच्या मालमत्तेतल्या इमारतींची किंमत त्यांच्या Software विभागापेक्षा जास्त आहे हे तुम्हाला माहीत आहे का? रोल्टा मुंबई, कोलकाता आणि वडोदरा येथे अत्यंत प्राइम लोकेशनवर भव्य इमारतींचे मालक आहेत. मुंबईमध्ये तर त्यांची जवळपास 40,000 चौ.फुटाची मालकीची इमारत आणि मिडसी, अंधेरी पूर्व येथे एकूण 1 लाख चौ.फुटांहून अधिक क्षेत्रफळाच्या चार लीजहोल्ड इमारती आहेत. त्याशिवाय, कोलकाता येथील लॉर्ड सिन्हा रोडवर 2,000 चौ.फुटांहून अधिक क्षेत्रफळाचे व्यावसायिक कार्यालय आणि वडोदरा येथील R.C Dutt रोडवर दोन व्यावसायिक कार्यालय इमारती आहेत.

पतंजलीने कशी मारली बाजी?

आज या बोलीत पतांजली आयुर्वेदाने धमाकेदार एंट्री केली(Patanjali News). त्यांनी अशदान प्रॉपर्टीजच्या 760 कोटी रुपयांच्या ऑफरला मागे टाकत 830 कोटी रुपयांची बोली लावली. पण हे विशेष का आहे? कारण अशदानची ही रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याची होती तर पतांजलीने एकदम रोख रक्कम देण्याचे आश्वासन दिले आहे.