Pawan Munjal ED : Hero MotoCorp चे CMD पवन मुंजाळ यांच्याविरोधात ED ची कारवाई

Pawan Munjal ED : Hero MotoCorp चे CMD आणि चेअरमन पवन मुंजाळ यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. पवन मुंजाळ यांच्या विरोधात इडीने मोठी कारवाई केली आहे. इडी कडून पवन मुंजाळ यांच्या तब्बल तीन बेकायदेशीर जमिनींवर आक्षेप घेण्यात आला आहे. या तिन्ही मालमत्तांची किंमत 24.95 कोटी रुपये असून मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही मोठी कारवाई केली आहे. पवन मुंजाळ यांनी रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या रेमीटन्स योजनेचा(liberalised remittance scheme) गैरवापर करून परदेशातील 54 कोटी रुपयांचे विदेशी चलन आणि मौल्यवान वस्तूंचा बेकायदेशीर वापर वैयक्तिक खर्चासाठी केल्याचा आरोप त्यांच्या नवे करण्यात आला आहे.आज जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाबद्दल ….

इडीने केली मोठी कारवाई: (Hero MotoCorp)

पवन मुंजाळ यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर अंमलबजावणी संचालनाकडून पवन मुंजाळ यांची 50 कोटी रुपये आतापर्यंत जप्त करण्यात आले आहेत. पवन मुंजाळ यांनी 54 कोटी रुपये बेकायदेशीर मार्गाने देशाबाहेर नेले असा त्यांचावर आरोप करण्यात आला आहे. या संधार्बत ED कडून सीमाशुल्क कायदा 1962च्या कलम 135 अंतर्गत मुंजाळ यांच्या विरोधात बेकायदेशीरपणे विदेशी चलन देशाबाहेर नेल्याच्या आरोपाखाली तपास सुरु करण्यात आला होता.

प्रकरणा संदर्भात EDचे म्हणणे आहे कि, “हे परकीय चलन एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने अधिकृत डीलर्सकडून विविध कर्मचार्‍यांच्या नावाने जारी केले आणि त्यानंतर पावन मुंजाळ यांच्या रिलेशनशिप मॅनेजरला दिले. यापुढे रिलेशनशिप मॅनेजरकडून मुंजाळ यांच्या वैयक्तिक खर्चासाठी गुप्तपणे हे परकीय चलन रोख किंवा कार्डच्या स्वरुपात वापरण्यात आले होते”.

मुंजाळ यांच्याविरोधात (Pawan Munjal ED) कारवाई झालेली हि पहिली खेप नाही. याआधी वर्ष 1 ऑगस्ट 2023 मध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होत तसेच त्यांच्या दिल्ली आणि गुरुग्राममधील 12 ठिकाणांवर छापे टाकून 25 कोटी रुपयांचे विदेशी चलन, सोने आणि दागिने जप्त करण्यात आले होते. गेल्या प्रकरणातही मुंजाळ यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचे आरोप लागले होते आणि त्यांच्यासोबतच अमित बाली, हेमंत दहिया आणि केआर रमण यांच्याविरुद्ध आरोपपत्रे जारी करण्यात आली होती.