Paytm Agent Job: घरबसल्या पैसे कमावण्याची सर्वोत्तम संधी; Paytm देईल महिन्याला 30 हजार रुपये

Paytm Agent Job : सध्या देशात ऑनलाइन पेमेंटचं वारं जोरदार वाहतंय. टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस प्रगती करत असल्यामुळे आता कोणीही हातात पैसे घेऊन आर्थिक व्यवहार करीत नाहीत. डिजिटल पेमेंटमुळे पैशांची देवाणघेवाण सोपे झाली आहे, तसेच यामुळे अनेकांचा वेळ वाचतोय. तुम्हाला माहिती आहे का की याच डिजिटल बदलांचा वापर करून घेत तुम्ही डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात एक चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळवू शकता. हातात असलेल्या स्मार्टफोनचा वापर करत घरबसल्या तुम्ही Paytm चे एजंट बनत दर महिना 10 हजार ते 30 हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकता. वाढत्या तांत्रिकी बदलांमुळे घरबसल्या भरपूर पैसे कमावता येतात. त्यामुळे तुम्हाला देखील वेळेचा सदुपयोग करत, एखादी वेगळी नोकरी करायची असेल तर पेटीएमचा एजंट होण्याबाबत नक्कीच विचार करावा..

पेटीएमचा एजंट म्हणजे काय? (Paytm Agent Job)

Paytm चा एजंट कंपनीच्या ऑनलाइन सेवांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तुमच्याजवळ जर का व्यवस्थित इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल तर नक्कीच घरबसल्या तुम्ही ही नोकरी स्वीकारू शकता. कामाच्या आवश्यकतेनुसार तुम्ही फुल टाइम किंवा पार्ट टाइम अश्या एका पर्यायाची निवड करू शकता. पेटीएम ही एक ई-कॉमर्स शॉपिंग वेबसाईट आहे ज्याची सुरुवात वर्ष 2010 मध्ये करण्यात आली होती. आता ऑनलाईन बँकिंगची सेवा घरोघरी पोहोचवण्यासाठी पेटीएम ने एजंटची नियुक्ती करायला सुरुवात केली आहे.

तुम्ही कंपनीला जेवढा जास्त नफा कमवून द्याल, त्यानुसार कंपनी देखील तुम्हाला वेळोवेळी वेतन देऊ करेल. पेटीएमचे एजंट बनत तुम्ही कंपनीच्या ग्राहकांना इलेक्ट्रिसिटी बिल, मोबाईल रिचार्ज, ट्रेन किंवा बस तिकीट यांचे बुकिंग किंवा अन्य आर्थिक व्यवहारांशी निगडित सेवा प्रदान करू शकता (Paytm Agent Job). एटीएम एजंट बनण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला कंपनीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, त्यानंतर कंपनीकडून तुम्ही दिलेल्या माहितीची तपासणी करण्यात येईल.

पेटीएम एजंट बनण्याची पात्रता काय?

पेटीएम एजंट बनण्याची जर का तुमची इच्छा असेल तर सर्वात आधी तुमचं वय हे अठरा वर्षांपेक्षा अधिक असला पाहिजे. त्याचप्रमाणे पेटीएम एजंट कडे किमान दहावीपर्यंतचे शिक्षण असणं अनिवार्य आहे. तुम्हाला कंपनीच्या ग्राहकांशी योग्य संवाद साधता आला पाहिजे तसेच KYC ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्याजवळ फिंगरप्रिंट स्कॅनर आणि ओटीजी केबल असली पाहिजे. पेटीएम एजंट बनण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.

यासाठी सर्वात आधी तुम्हाला पेटीएम सर्विस एजंट च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. यानंतर apply now हा पर्याय निवडून तुम्हाला आवश्यक सर्व माहिती द्यावी लागेल, (यामध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर, पिन कोड, राज्य इत्यादी माहितीची मागणी केली जाते) त्यानंतर कंपनी आवश्यकतेनुसार काही प्रश्न विचारेल आणि त्यांची योग्य उत्तर तुम्हाला समाविष्ट करावी लागतील. पुढे Submit, हा पर्याय निवडल्यानंतर तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल (Paytm Agent Job) आणि कंपनी गरजेनुसार तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न करेल.