Paytm Bank: मनी लाँड्रिंग रोखण्यासाठीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे, भारतीय वित्तीय गुप्तचर युनिट (FIU-IND) ने Paytm Payments Bank Limited वर आज म्हणजेच शुक्रवारी 1 मार्च रोजी 5.49 कोटींचा दंड ठोठावला आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे.
Paytmने केलं कायद्याचं उल्लंघन: (Paytm Bank)
गुन्हेगारी कारवाई करणाऱ्या संस्थांनी ऑनलाईन जुगारासाठी वापरलेल्या काळ्या पैशासाठी Paytm Payment Bank च्या खात्यांचा वापरा केल्याची माहिती कायदा अंमलबजावणी संस्थांकडून मिळाल्यानंतर, वित्तीय गुप्तचर युनिट (FIU-IND) ने बँकेची चौकशी सुरू केली.
Paytm Payments Bank ने लेखी आणि मौखिक युक्तिवादांची सखोल चाचणी केल्यानंतर, गुन्हेगारी आर्थिक व्यवहार प्रतिबंध कायदा (FEMA) – भारताच्या संचालकांनी बँकेवर केलेले आरोप सिद्ध झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्यानुसार, बँकेवर 5.49 कोटी रुपयांचा दंडात्मक कर (penalty) ठोठावण्यात आलाय.
Paytm Bank चे दंडाबाबत स्पष्टीकरण:
घडलेल्या सर्व घटनेबाबत बँकेच्या प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, “ही दंडाची कारवाई दोन वर्षांपूर्वी बंद केलेल्या व्यवसाय विभागातील चुकांशी संबंधित आहे. त्यावेळापासून आम्ही आमच्या देखरेखी व्यवस्थेमध्ये सुधारणा केली आहे आणि आर्थिक गुप्तचर युनिट(FIU) कडे वृत्त देण्याची पद्धत मजबूत केली आहे.”