Paytm Crisis: नुकतीच, भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन कंपन्यांपैकी एक असलेल्या Paytm वर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून कठोर कारवाई करण्यात आली. गुरुवारी RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले की Paytm प्रकरणात चिंता करण्याची गरज नाही आणि Paytm पेमेंट्स बँकेवर कारवाई नियमांचे पालन न केल्याने करण्यात आली आहे. विचार केला तर Paytm खरोखर एक मोठी कंपनी आहे आणि तिचा ग्राहकवर्ग देखील अफाट आहे, त्यामुळे कंपनीच्या ग्राहकांना होणाऱ्या घटनांचा त्रास होणं स्वाभाविक आहे.
Paytm बद्दल काय म्हणाले शक्तिकांत दास?
आज देशातील सर्वोच्य बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरांनी Paytm बद्दल पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले की Paytm ने काही बँकिंग नियमांचे पालन न केल्यामुळे त्यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. RBI ने नुकतेच Paytm पेमेंट्स बँकेवर काही निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांमुळे बँकेची अनेक सेवा बंद होतील. यात Wallet आणि FasTag, नवीन ग्राहक जोडणे आणि बँक खात्यात पैसे जमा करणे यांचा समावेश होतो. या निर्बंधांमुळे Paytm पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागेल(Paytm Crisis). ते आता वॉलेट आणि फास्टैग रिचार्ज करू शकणार नाहीत तसेच, नवीन ग्राहक खात्यात पैसे जमा करू शकणार नाहीत.
पुढे शक्तिकांत दास म्हणाले की RBI द्विपक्षीय पद्धतीने संस्थांशी काम करते आणि या सर्वांना नियमांचे पालन करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात येतो. जर एखाद्या संस्थेने आवश्यक पावले उचलली नाहीत तरच देखरेखीच्या पातळीवर कारवाई केली जाते. नियंत्रित कंपन्या (Bank and NBFC) प्रभावी कारवाई करत नसतील तर कामकाजावर बंदी घालण्याची कारवाई केली जाते आणि लक्ष्यात घेण्याचा मुद्दा म्हणजे ही कारवाई प्रणालीगत स्थिरता आणि जमादारांच्या किंवा ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केली जाते.