Paytm Crisis: “कर्मचाऱ्यांनी काळजी करू नये”; कठीण काळात CEO शर्मा यांचा कर्मचाऱ्यांना दिलासा

Paytm Crisis: Online Payment सेवा देणारी Paytm कंपनी सध्या मोठ्या अडचणीतून जात आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेटीएम पेमेंट बँकवर (Paytm Payment Bank) बंदी घातल्यानंतर कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत मोठी घसरण झाली. अवघ्या 3 दिवसात कंपनीचे शेअर 43 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहेत. या संकटातही Paytm ने आपल्या वापरकर्त्यांना आणि कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले आहे, आणि कर्मचाऱ्यांचा विश्वास जपण्यासाठी हे अत्यंत आवश्यक होते. Paytm ने म्हटले आहे की, “या अडचणी तात्पुरत्या आहेत आणि लवकरच मार्ग निघेल.” कंपनीने कर्मचाऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही असेही सांगितले आहे.

Paytmचं कर्मचाऱ्यांना आश्वासन: (Paytm Crisis)

Paytmचे संस्थापक आणि CEO विजय शेखर शर्मा यांनी कंपनीच्या सध्याच्या अडचणीच्या काळात कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, शर्मा यांनी सांगितले की नक्की काय चूक झाली याबद्दल त्यांना पूर्णपणे खात्री नाही, परंतु लवकरच सर्वकाही सोडवले जाईल. Paytm कंपनी सध्या अनेक आव्हानांना तोंड देत आहे. कंपनीचा शेअर दर गेल्या वर्षभरात 70 टक्यांनी घसरले आहेत आणि कंपनीच्या नुकसानीतही वाढ झाली आहे. यामुळेच कंपनी कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याच्या अफवांनाही खतपाणी मिळाले.

मात्र शर्मा यांनी या अफवांना फेटाळून लावले आणि कर्मचाऱ्यांना नोकरीची सुरक्षा असल्याचे आश्वासन दिले. त्यांनी कंपनी नवीन व्यवसायांमध्ये गुंतवणूक करत असल्याचे आणि लवकरच ते फायदेशीर ठरतील असा विश्वास व्यक्त केला. कर्मचाऱ्यांनी शर्मा यांच्या आश्वासनाचे स्वागत केले आहे. एका कर्मचाऱ्याने सांगितले की, “CEO यांच्या शब्दांमुळे मला आश्वासन मिळाले आहे. मला खात्री आहे की कंपनी लवकरच या अडचणीतून बाहेर पडेल.”

Paytm च्या संकटांचे कारण काय?

31 जानेवारी 2024 रोजी, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पेटीएम पेमेंट बँकेवर बंदीचे आदेश जरी केले होते(Paytm Crisis). RBI ने हे पाऊल बँकिंग नियमांचे उल्लंघन आणि डेटा सुरक्षिततेबाबत चिंतेमुळे उचलले असून सर्वोच्य बँकेच्या आदेशानुसार आता 29 फेब्रुवारीपासून पेटीएम पेमेंट बँक नवीन ग्राहक जोडू शकणार नाही. तसेच या बँकेला नवीन खाती, वॉलेट आणि FASTag मध्ये पैसे जमा करण्याची परवानगी नाही.

यानंतर Paytmची मूळ कंपनी One97 Communicationsने 4 फेब्रुवारी 2024 रोजी दाखल केलेल्या फाइलिंगमध्ये Paytm चे संस्थापक आणि कंपनीवर अंमलबजावणी संचालनालयाने (ED )मनी लाँड्रिंग क्रियाकलापांसाठी गुन्हा दाखल केल्याच्या बातम्या पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत.