Paytm Crisis: Paytmची सेवा 15 मार्च नंतर बंद होणार नाही; RBI ची मोठी कबुली

Paytm Crisis: भारतात QR आणि मोबाइल पेमेंट क्षेत्रातील आघाडीचे नाव असलेल्या Paytm ने देशभरातील व्यापारी, लहान दुकानांपासून मोठ्या मोठ्या उद्योगांपर्यंत यांच्यासाठी एक मजबूत डिजिटल व्यवस्था उभारली, यामुळे त्यांना त्यांच्या डिजिटल प्रवासाचा वेग वाढवता आला आहे. कालपासूनच Paytmची सेवा 15 मार्च पर्यंत पुढे ढकलण्यात आली असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि आज सामोर आलेली महत्वाची गोष्ट म्हणजे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता पुष्टी केली की Paytmच्या व्यापारी पेमेंट सेवा 15 मार्चनंतरही सुरळीत चालू राहतील.परिणामी व्यापाऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय त्यांचे व्यवहार करता येणार आहेत.

Paytmची सेवा आता कायम सुरु राहणार? (Paytm Crisis)

कंपनीने घोषणा केली आहे की त्यांचे QR Code, Soundbox आणि Card Machine नेहमीप्रमाणे चालू राहतील. याचा अर्थ व्यापाऱ्यांना कोणत्याही अडचणींशिवाय या सेवांचा वापर करता येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर का व्यापारी असाल तर अजिबात काळजी करू नका तुमचे व्यवहार सुलभ आणि अखंड चालत राहाणार आहेत. हे कसं शक्य झालं? कंपनीने आपले नोडल खाते आता Axis Bank कडे हलवले आहे. यामुळे तुमचे पेमेंट्स आतादेखील नेहमीप्रमाणे जलद आणि सुरक्षितपणे केले जातील.

Paytm या फिनटेक कंपनीला आपल्या व्यापारी नेटवर्काला काहीही अडचण न येऊ देण्यासाठी त्यांचे नोडल खाते दुसऱ्या बँकेकडे हस्तांतरित करायचे होते, त्यासाठी त्यांनी अनेक नामवंत बँकांशी चर्चा केली(Paytm Crisis). पण इथे एक धमाल गोष्ट समोर आली. या कंपनीची उपकंपनी, Paytm Payment Services Limited (PPSL) सुरुवातीपासूनच Axis Bank सोबत काम करत असल्याने त्यांना हे खाते दुसऱ्याकडे हलवण्याची गरज भासली नाही आणि म्हणूनच 15 मार्च नंतर देखील हे व्यवहार सुरळीत सुरु राहणार आहेत.