Paytm Crisis: Paytm ही भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट कंपन्यांपैकी एक, जी सध्या अनेक संकटांना तोंड देत आहे आणि हे कुणापासून लपलेलं नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली पेटीएम पेमेंट्स बँकेची चौकशी करण्याचे आदेश प्रवर्तन संचालनालयाला (ED) दिले आहेत. ED ने आधीच कंपनीच्या कार्यालयांवर छापेमारी केली असून आता कंपनीची चौकशी सुरू केली आहे. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी RBI ने Paytm वर ED चौकशीची मागणी केली असल्याचे म्हटले जाते.
Paytm करणार तपासात संपूर्ण सहकार्य: (Paytm Crisis)
Paytm ने स्पष्ट केले आहे की ते कंपनी रेग्युलेटरच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहेत. One97 Communications Limited आणि पेटीएम पेमेंट्स बँक यांच्याशी संबंधित कोणतीही माहिती त्यांच्याकडून लपवली जाणार नाही. या प्रकरणात ED सह इतर रेग्युलेटर आणि कायदेशीर यंत्रणांना माहिती आणि स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता भासू शकते, आणि अश्यावेळी ते स्वत:ची खरी बाजू मांडण्यापासून मागे हटणार नाहीत.
RBI ने पेटीएम पेमेंट बँकेला थोडी दिलासा देत एक महिन्याची मुदत दिली आहे. यामागे ग्राहकांना त्रास होऊ नये केवळ हाच उद्देश सांगितलं जातोय, पण या मुदतीत Paytm बँकेला कायद्याचे उल्लंघन करणारे व्यवहार बंद करावे लागतील. RBIच्या या निर्णयामुळे शेअर्ज बाजारात कंपनीला नुकसानीचा सामना करावा लागतोय.