Paytm Crisis: Paytm Payment’s Bankवर RBI ची कारवाई झाल्यानंतर अडचणीत आलेल्या Paytmने SBI शी हातमिळवणी केली आहे. याचा अर्थ आता जर का तुम्ही या पेमेंट कंपनीचे ग्राहक असाल आणि Paytm App वापरत असाल तरी Third Party Application Provider (TPAP) म्हणून तुमच्या बँकेशी थेट कनेक्ट करणं सोपं होणार आहे. कारण या हातमिळवणीनंतर आता Paytm फक्त एक लिंकच काम करणार आहे जे तुमच्या बँकेशी संवाद साधेल आणि थेट तुमच्या खात्यातून पेमेंट्स(Payments) करेल.
काय आहे कंपनीची स्थिती?(Paytm Crisis)
Paytm चालवणारी कंपनी One 97 Communications (OCL) ने आपल्या डिजिटल पेमेंट्सच्या सिस्टममध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. आतापर्यंत पेमेंट्स संबंधित रक्कम दुसऱ्या बँकेकडे जमा होत होती. स्टेट बँक सोबत हातमिळवणी करण्याआधी त्यांनी 15 मार्चपासून लागू होणाऱ्या नियमावलीच्या अनुपालनासाठी त्यांनी ही रक्कम Axis Bank या खासगी बँकेकडे ट्रांसफर केली होती. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण भारतीयांनी फेब्रुवारीमध्ये पेमेंट्स करण्यासाठी Paytm App मोठ्या प्रमाणात वापरलं होतं (Paytm Crisis). आकडेवारी नुसार, एका महिन्यात तब्बल 1.41 अब्ज पेमेंट्स झाल्या आहेत.