Paytm Crisis: देशातील सर्वोच्य बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतलेला मोठया निर्णयानंतर आता Paytmने एक महत्वाची बातमी जाहीर केला आहे, बँकच्या निर्णयानुसार Paytmला 29 फेब्रुवारीपासून सर्व आर्थिक व्यवहार बंद करण्याचा आदेश देण्यात आला, आणि त्यानंतर आज Paytm कडून आलेली माहिती सांगते की ते लवकरच दुसऱ्या बँक सोबत काम करणार आहेत, पण दुसऱ्या बँका म्हणजे तरी काय? चला मग जाणून घेऊया…
Paytmने घेतला नवीन निर्णय: (Paytm Crisis)
सर्वोच्य बँकच्या निर्णयानंतर Paytm वर याचा चहू बाजूंनी परिणाम झालेला दिसला, काल शेअर बाजारात कंपनीचे शेअर देखील जोरदार आपटले होते. परिस्थती कठीण असली तरीही Paytm काही सुधारणा होण्याची वाट पाहत हातावर हात ठेऊन बसू शकत नाही, म्हणूनच त्यांची पालक कंपनी One97 communications यांनी सर्वांसमक्ष एक मोठी घोषणा केली आहे.
OCL एक पेमेंट कंपनी आहे जी Paytm Payments Bank आणि इतर अनेक बँकांसोबत काम करते. भविष्यात, OCL फक्त Paytm Payments Bank वर अवलंबून न राहता इतर बँकांसोबत काम करणार आहे. याचा अर्थ असा की OCL, Paytm Payments Bank द्वारे दिलेल्या सेवा पुरवणे बंद करेल आणि त्याऐवजी इतर बँकांद्वारे पुरवण्यात येणाऱ्या सेवांवर लक्ष केंद्रित करेल.
Paytm च्या शेअर्सवर विपरीत परिणाम:
गुरुवारी 20 टक्क्यांच्या घसरणीनंतर, शुक्रवारी Paytmच्या शेअर्समध्ये पुन्हा घसरण झाली. Paytm ची मूळ कंपनी One97 Communications च्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण होऊन ते लोअर सर्किटला आले. शेअरची किंमत 121.80 रुपयांनी घसरून 487.20 रुपत्यांपर्यंत पर्यंत खाली आली आणि यामुळेच कंपनीचे बाजारमूल्य 30,940 कोटी रुपयांवर घसरले आहे.
Paytm चे CEO विजय शेखर शर्मा यांच्या आश्वासनामुळे वापरकर्त्यांना दिलासा:
RBI च्या कारवाई आणि शेअरच्या किमतीत घसरण झाल्यानंतर Paytm चे संस्थापक आणि CEO विजय शेखर शर्मा यांनी X प्लॅटफॉर्मद्वारे वापरकर्त्यांना आश्वासन दिले आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, “मी प्रत्येक पेटीमरला सांगू इच्छितो की तुमचे आवडते ॲप कार्यरत आहे आणि ते 29 फेब्रुवारीनंतरही नेहमीप्रमाणे काम करत राहील. तुमच्या अथक पाठिंब्याबद्दल मी Paytm टीमच्या प्रत्येक सदस्यासह तुम्हाला सलाम करतो. प्रत्येक आव्हानाला एक उपाय आहे आणि आम्ही पूर्ण पालन करून आमच्या देशाची सेवा करण्यासाठी प्रामाणिकपणे वचनबद्ध आहोत(Paytm Crisis).