Paytm Crisis: जसं की आपल्याला माहिती आहे, बजेट येण्याच्या ठीक एक दिवस अगोदर देशातील सर्वोच्य बँकेने Paytm च्या विरुद्ध एक महत्वाचा निर्णय जाहीर केला होता आणि याच्याच परिणामी आता कंपनीला 29 फेब्रुवारीपासून आपल्या बँकिंग सेवा बंद कराव्या लागतील. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारने त्यांच्या द्वितीय कार्यकाळातील शेवटचं बजेट प्रस्तुत केलं होतं आणि या बजेटमध्ये काही घोषणा करण्यात आल्या होत्या. त्यानंतर एका मुलाखतीत बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या आहेत की सरकारला फिनटेकमध्ये अधिक रुची आहे, मात्र यापुढे Paytm च्या मामल्याबद्ल अर्थमंत्री काही बोलल्या का? चला मग जाणून घेऊया…
Paytmच्या परिस्थतीवर काय म्हणाल्या अर्थमंत्री?
Paytmला सर्वोच्य बँकने देऊ केलेल्या कडक आदेशांमुळे 29 फेब्रुवारीपासून सर्व बँकिंग व्यवहार बंद करावे लागणार आहेत, परिणामी कंपनीचे ग्राहक वॉलेट, Fastag किंवा अन्य बँकिंग सेवांचा वापर करू शकणार नाही आणि याच परिस्थतीचा आधार घेऊन एका मुलाखतीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. Paytm ही आपल्या देशातील बऱ्यापैकी नावाजलेली कंपनी आहे त्यामुळे अर्थमंत्री उत्तर देतील अशी अपेक्षा सर्वांनाच होती, मात्र अर्थमंत्र्यांनी अगदी विचारपूर्वक निर्णय घेत या विषयवार काहीही वक्तव्य करण्यापासून साफ साफ नाही म्हटलं.
Paytm Crisis आहे तरी काय?
रिझर्व्ह बँकेने Paytm Payment Bank वर नुकतीच कारवाई केली आहे. या कारवाईमुळे बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, बँकेला ठेवी स्वीकारण्यास आणि क्रेडिट व्यवहार करण्यासही मनाई करण्यात आली आहे. ही कारवाई एका ऑडिट रिपोर्टच्या(Audit Report) आधारे करण्यात आली आहे. या रिपोर्टमध्ये Paytmच्या बँकिंग सेवांमध्ये गैर-अनुपालन आणि महत्त्वाच्या देखरेखीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती.
जर तुम्ही Paytm वापरत असाल तर तुमच्यावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. 29 फेब्रुवारीनंतर तुम्ही वॉलेटमध्ये जमा केलेले पैसे वापरू शकाल, पण तुम्ही त्यात नवीन पैसे जमा करू शकणार नाही(Paytm Crisis). तुम्ही पूर्वीप्रमाणेच UPI वापरू शकता, परंतु टॉप-अप, गिफ्ट कार्ड आणि फास्टॅग रिचार्ज करू शकणार नाही.
हे थोडं अवघड वाटत असलं तरी, तुम्हाला अजूनही बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही Google Pay, PhonePe, Amazon Pay सारख्या इतर डिजिटल वॉलेटचा वापर करू शकता किंवा UPI द्वारे थेट तुमच्या बँक खात्यातून पैसे पाठवू आणि मिळवू शकता. त्यामुळे थोडे बदल घडणार असले तरीही अजूनही तुमच्या व्यवहारांसाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. थोडं संशोधन करा आणि तुमच्यासाठी सर्वात योग्य ठरणारा पर्याय निवडा.