Paytm Crisis: पेमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी Paytmसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) काही दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याचं चित्र दिसत आहे. Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी नुकताच अर्थ मंत्रालय आणि RBI यांना या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. मात्र, सोमवारी RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी Paytm संदर्भात कोणतीही कारवाई करण्यास स्पष्टपणे नकार दिला असून, पेटीएम पेमेंट्स बँकेच्या प्रकरणाची पुन्हा परीक्षा घेतली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं, यामुळे Paytm समोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
Paytm समोरचं नवीन आव्हान कोणतं? (Paytm Crisis)
सोमवारी RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्टपणे सांगितले की, Paytm बाबत कोणतीही पुनर्विचारणा केली जाणार नाही आणि पेटीएम पेमेंट बँकेवर बंदी कायम राहणार आहे. या निर्णयामुळे कंपनी आणि लाखो ग्राहकांच्या समोर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे, Paytm ला त्यांच्या E-Wallet व्यवसाय इतर बँकांकडे वळता करावा लागणार असल्याने अनेक ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
RBI ने Paytm पेमेंट्स बँकेवर कारवाई केली आहे आणि त्याबाबत कोणतीही चूक केलेली नाही. ग्राहकांचे हित जपण्यासाठी आणि सर्व काटेकोरपणे तपासणी करून हा निर्णय घेतला असल्याचे गव्हर्नर यांनी सांगितले. सर्वोच्य बँकचे गव्हर्नर पुढे असंही म्हणाले की कोणालाही या घटनेमुळे चिंता करण्याचे कारण नाही, कारण जे काही सुरु आहे ते केवळ Paytm च्या बाबतीत आहे, बँकला फिनटेक कंपन्यांबद्दल कोणतेही प्रश्न नाहीत.
आता Paytm चं पुढे काय होणार?
RBI नी पेटीएम पेमेंट्स बँकेवर घेतलेला निर्णय जसा आहे तसाच राहणार आहे. म्हणजे, आता 29 फेब्रुवारीपासून काय बदल होणार(Paytm Crisis) आणि Paytm च्या ग्राहकांकडे कोणते पर्याय आहेत ते बघूया.
सर्वात आधी, महत्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्ही तुमच्या Paytm पेमेंट अकाउंट, Wallet किंवा FASTag मध्ये नवीन पैसे जमा करू शकणार नाही. पण चिंता करू नका, आत्ता त्यात जी रक्कम आहे ती वापरण्याला हरकत नाही. त्याचबरोबर, बँक खात्यातून पैसे पाठवणं आणि मिळवणं यासाठी तुम्ही Paytm UPI वापरू शकता. हे सोपं, नाही का?