Paytm Crisis: Paytmचा चीनशी संबंध; सर्वोच्य बँकनंतर आता सरकार करणार का पोलखोल?

Paytm Crisis: आपल्या सर्वांनाच माहिती आहे की फिनटेक कंपनी One97 Communicationsची सहायक कंपनी Paytm Payments Services Limited (PPSL) सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. रिझर्व्ह बँकेकडून कारवाई झाल्यावर आता सरकारकडूनही त्यावर कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जातेय, कारण भारत सरकारने कंपनीच्या चीनशी असलेल्या संबंधांवर चौकशी सुरू केली आहे. यात Paytm Payment Services मध्ये चीनकडून झालेल्या थेट परकीय गुंतवणुकीची (FDI) तपासणी केली जाणार आहे.

Paytm आणि चीन यांचा संबंध काय? (Paytm Crisis)

चीनची Ant Financial ही कंपनी Paytmची मूळ कंपनी One97 Communications मध्ये 10 टक्क्यांपेक्षा कमी हिस्सा धारण करते. One 97 Communicationsचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्याकडे कंपनीचे 24.3 टक्के शेअर्स आहेत. पूर्वी, चीनची अलीबाबा ही कंपनी Paytm मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणारी प्रमुख भागधारक होती. मात्र, 2023 मध्ये अलीबाबाने 13,600 कोटी रुपयांमध्ये One 97 Communications मधील आपली संपूर्ण हिस्सेदारी विकली.

भारताची यावर प्रतिक्रिया काय?

भारत सरकार Paytm Payment Services मधील चीनच्या प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीची (FDI) चौकशी करत आहे. Paytm Payment Services ही One97 communications Limited (OCL) ची उपकंपनी असून आताच्या घडीला चीनमधील अँट ग्रुप कंपनी यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करते.

Paytm Payment Services ने नोव्हेंबर 2020 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI) पेमेंट एग्रीगेटर (PA) म्हणून काम करण्यासाठी परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता(Paytm Crisis). परंतु, RBIने नोव्हेंबर 2022 मध्ये अर्ज नाकारला आणि कंपनीला FDI नियमांनुसार प्रेस नोट 3 चे पालन करण्यासाठी पुन्हा अर्ज करण्यास सांगितले. प्रेस नोट 3 मध्ये, भारत सरकारने भारत-चीन सीमा सामायिक करणाऱ्या देशांमधून कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करण्यापूर्वी सरकारची मंजूरी घेणे बंधनकारक केले आहे.