Paytm FASTag: Paytm FASTag बंद होणार; 2 कोटी ग्राहकांनी करावं तरी काय?

Paytm FASTag: Paytm FASTag बंद होत आहे आणि याचा परिणाम 2 कोटी ग्राहकांवर होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(NHAI) ने FASTag वापरकर्त्यांसाठी एक सूचना जारी केली आहे, ज्यामध्ये NHAI ने देशातील केवळ 32 बँकांकडूनच FASTag खरेदी करण्याचे आवाहन केले आहे आणि यामध्ये Paytm Payments Bank चा समावेश नाही.

FASTag खरेदीसाठी 32 बँकांची यादी जारी: (Paytm FASTag)

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(NHAI) नुसार FASTag खरेदीसाठी 32 बँकांची यादी जारी करण्यात आली आहे. या यादीत Paytm पेमेंट्स बँकचा समावेश नसल्याने आता तुम्ही Paytm पेमेंट्स बँकेद्वारे FASTag खरेदी करू शकणार नाही. यापूर्वी Paytm पेमेंट्स बँकेद्वारे FASTag खरेदी केले गेले असल्यास तुम्हाला ते सरेंडर म्हणजेच जमा करावे लागतील आणि NHAIने अधिकृत केलेल्या 32 बँकांपैकी एका बँकेतून नवीन FASTag खरेदी करावा लागेल.

FASTag काय आहे?

FASTag हे Electronic Toll Collection System आहे. FASTag वापरून तुम्ही टोल प्लाझावर रोख न देता टोल भरण्यास सक्षम बनता. FASTag तुमच्या वाहनाच्या विंडस्क्रीनवर चिकटवले जाते आणि ते टोल प्लाझावरील RFID रीडरद्वारे वाचले जाते (Paytm FASTag).

FASTags साठी नोंदणीकृत बँका:

FASTags साठी अनेक बँकांनी नोंदणी केली आहे. यात Airtel Payment Bank, Axis Bank, Bank Of Baroda, Bank Of Maharashtra, Canara Bank, Central Bank Of India, HDFC Bank, ICICI Bank, IDBI Bank, Indian Bank, Karnataka Bank, Kotak Mahindra Bank, Punjab National Bank, Saraswat Bank, Shakari Bank, Union Bank Of India आणि इतर बँकांचा समावेश होतो.