बिझनेसनामा ऑनलाईन । PayTM हे एक ऑनलाईन डिजिटल पेमेंट ॲप असून याचा वापर जगातील कित्येक लोक प्रत्येक एका मिनिटाला करत असतात. पेटीएम देखील आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमी नवनवीन फिचर्स उपलब्ध करून देताना दिसते. आता तर पेटीएमने त्याच्या ग्राहकांसाठी एक पॉकेट साऊंडबॉक्स लॉन्च केला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, नुकताच बाजारात पेटीएम पॉकेट साउंड बॉक्स व पेटीएम म्युझिक साउंड लॉन्च झाला आहे. पेटीएमचे मालक असलेल्या ओसीएलने नुकतेच बाजारात दोन नाविन्यपूर्ण पेमेंट डिव्हाइसेस लॉन्च केले आहेत.
दुकानात बसून ऐकू शकता गाणी-
हा पेटीएम पॉकेट साउंडबॉक्स आपण खिशामध्ये देखील सहज वागवू शकतो. या साऊंडचा आकार एखाद्या डेबिट कार्ड इतकाच आहे. ओसीएलने लॉन्च केलेले डिव्हाइस ‘मेड इन इंडिया’ अंतर्गत तयार करण्यात आले आहे. एकदा चार्ज केल्यानंतर या साऊंड बॉक्सची चार्जिंग पाच दिवस टिकते. कंपनीने यामध्ये अलर्ट, टॉर्च असेही नवीन फिचर्स दिले आहेत. तसेच हा साऊंडबॉक्स आपण फोनला ब्लूटूथच्या माध्यमातून कनेक्ट केल्यावर आपण त्यावर गाणीही ऐकू शकतो. या म्युझिक बॉक्सला एकदा चार्ज केल्यानंतर याची बॅटरी तब्बल सात दिवस टिकते. या म्युझिक बॉक्समध्ये 4जी कनेक्टिव्हीटी आणि ४ वॅट चा स्पीकर जोडण्यात आला आहे. यामुळे व्यापाऱ्याला दुकानात बसल्यानंतर म्युझिक ऐकत पेमेंटची नोटिफिकेशन देखील मिळू शकते.
याबाबत माहिती देताना कंपनीने सांगितले आहे की, “मोबाइल पेमेंट्स व क्यूआर तंत्रज्ञानाचे अग्रणी म्हणून आम्ही पेटीएम साउंडबॉक्ससह इन-स्टोअर पेमेंट्समध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे. आम्ही दोन नवीन डिव्हाइसेस पेटीएम पॉकेट साउंडबॉक्स व पेटीएम म्युझिक साउंडबॉक्ससह नाविन्यतेला अधिक चालना देत आहोत. हे दोन्ही डिव्हाइसेस व्यापाऱ्यांना सोयीसुविधा देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत”
दरम्यान भारतात पेटीएम या ऑनलाईन ॲप्ससोबत गुगल पे, फोन पे अशी ही अन्य ॲप्स कार्यरत आहेत. हे सर्व अँप आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स उपलब्ध करून देत असतात. सध्या पेटीएमची स्पर्धा या दोन्ही ॲप्स सोबत सुरू आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पेटीएमकडून पॉकेट साउंड बॉक्स व पेटीएम म्युझिक साउंड बॉक्स लॉन्च करण्यात आले आहे. या साऊंड आणि म्युझिक बॉक्समुळे पेटीएम वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ होईल अशी आशा कंपनीला आहे.