Paytm Layoff: या महागाईच्या काळात तुम्ही अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याच्या घटना आपण वाचल्यास असतील. जगभरातील मोठाल्या कंपन्या जसे कि Google, Microsoft , Spotify यांची नावे देखील लेऑफच्या यादीत सामील आहेत. महागाई वाढत जात असल्याने सामान्य माणसाला नोकरीशिवाय जगणं सोपं नाही, अश्या परिस्थितीत या कंपन्या त्यांचा खर्च वाचवण्याचे कारण देऊन कर्मचारी वर्गाला बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. त्यातच आता लेऑफच्या यादीत आता एका नवीन कंपनीचा समावेश झाला असून हि कंपनी दुसरी तिसरी कोणीही नसून ऑनलाईन पेमेंटच्या जगात प्रतिष्ठित मानली जाणार Paytm कंपनी आहे. मोठमोठाल्या फिनटेक कंपन्यांनंतर आता Paytm ने नेमकं आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून का काढून टाकले ते जाणून घेऊया..
खर्च कमी करण्यासाठी घेतलाय निर्णय: Paytm Layoff
वर्ष संपायच्या आत ऑनलाईन पेमेंटच्या जगात दिग्गज मानली जाणारी कंपनी Paytm हिने आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रास्ता दाखवला आहे. कंपनीचा वाढत खर्च कमी करण्यासाठी आणि व्यवसायाची घडी नीट बसवण्यासाठी कंपनीने हा मोठा निर्णय (Paytm Layoff) घेतलाय अशी माहिती स्वतः कंपनीच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली. अनेक लोकांसाठी हि बातमी एका धक्यापेक्षा कामी नाही. पण कंपनी पुढे असेही म्हणाली आहे कि येणाऱ्या काळात यापेक्षाही मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या कंपनीचे नेमकं काय सुरु आहे याबद्दल कुणीही अंदाज लावू शकत नाही.
असं म्हणतात कि या मोठ्या निर्णयाचा सर्वाधिक धक्का कंपनीमधल्या १० टक्के लोकांना बसला आहे (PaytmLayoff). आणि पुढे जात याचा सर्वाधिक परिणाम कंपनीच्या लोन बिजनेसवर दिसून येईल. कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे येणाऱ्या काही काळात ती 10 ते 15 टक्के कर्मचारी वर्गात कपात (Paytm Layoff) करू शकते. AI च्या वापरला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनी हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र काही काळातच कंपनी बिजनेस क्षेत्रात 15,000 नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या विचारात असून या सर्व प्रकरणात हि एकमात्र आनंदाची बातमी म्हणावी लागेल.