Paytm News: Paytmला सर्वोच्य बँकेचा फटका!! 29 तारखेपासून व्यवहार बंद करण्याचा आदेश जारी

Paytm News: आज देशातील सर्वोच्य बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने Paytm बद्दल एक महत्वाचा निर्णय जारी केला आहे. रिझर्व्ह बँकच्या आदेशानुसार आता Paytm Payments Bank Limited (PPBL) ला ग्राहकांच्या खात्यासंबंधी व्यवहारावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे, परिणामी आता बँकेच्या वॉलेट आणि फास्टॅगमधून व्यवहार करता येणार नाहीत, तसेच कंपनी नवीन ग्राहकांना जोडू शकत नाही. हा नियम बँककडून 29 फेब्रुवारी 2024 पासून लागू करण्याचा आदेश देण्यात आलाय.

काय सांगतो सर्वोच्य बँकचा नवीन निर्णय? (Paytm News)

Paytm बद्दल घेतलेल्या नवीन निर्णयामध्ये रिझर्व्ह बँकने Paytm ला ग्राहकांकडून कोणतीरी रक्कम न स्वीकारण्याच्या सूचना दिल्या आहेत. बँकेच्या कामकाज आढळून आलेली अनियमितता पाहता सर्वोच्य बँकने हे मोठे पाऊल उचलले आहे. Paytm Payment Bank ला ग्राहक खाते, Wallet आणि Fastag मध्ये जमा असलेली किंवा Top-Up रक्कम स्वीकारण्यास बंदी आणण्यात आली आहे. ही कारवाई RBI ने बँकिंग अधिनियम, 1949 च्या कलम 35A च्या अधिकारांचा वापर करत केली आहे.

या कारवाईमुळे पेटीएम पेमेंट बँकेच्या ग्राहकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या बँकेत सुमारे 53 दशलक्ष ग्राहक आहेत. या ग्राहकांना आता पेटीएम पेमेंट बँकेत पैसे जमा करणे, पैसे काढणे किंवा फास्टॅगमध्ये टॉप-अप करणे शक्य होणार नाही. RBI ची ही कारवाई पेटीएम पेमेंट बँकेसाठी एक मोठा धक्का ठरेल, कारण या कारवाईमुळे पेटीएम पेमेंट बँकेची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता खराब होण्याची शक्यता आहे.

आरबीआयच्या नव्या नियमानुसार, ग्राहक खाते, प्रीपेड, वॉलेट, फास्टॅग, NCMC Card इत्यादी सेवांमध्ये 29 फेब्रुवारी 2024 नंतर कोणत्याही व्यवहारांवर बंदी असेल. म्हणजेच या तारखेनंतर तुम्ही तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करू शकणार नाही, पैसे काढू शकणार नाही, पैसे ट्रान्सफर करू शकणार नाही, किंवा चेक लिहू शकणार नाही (Paytm News). तथापि, तुमच्या खात्यात सध्या उपलब्ध असलेले पैसे तुम्ही वापरू शकता. या बंदीमुळे ग्राहकांना काही अडचणी येतीलच मात्र, परिणामी आर्थिक गुन्हेगारी रोखण्यास मदत होईल, असे RBI चे म्हणणे आहे.