Paytm News: भारतीय रिझर्व्ह बँकेनं धक्कादायक निर्णय घेतला आहे, आधी 29 फेब्रुवारीपर्यंतच चलणार असलेल्या Paytm पेमेंट्स बँकेच्या ठेवी आणि कर्ज व्यवहारांसाठी आता 15 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आधी तर बँकेने दिलेल्या स्पष्ट सूचनांनुसार 29 फेब्रुवारी या तारखेनंतर कोणतेही बँकिंग व्यवहार होणार नव्हते. म्हणजेच Paytm पेमेंट्स बँकेच्या खात्यात पैसे जमा करणे, कर्ज घेणे, पैसे ट्रान्सफर करणे, बिल भरणे, UPI वापरणे हे सर्व काही बंद होणार होते.
Paytm ला सर्वोच्य बँककडून दिलासा: (Paytm News)
Paytm पेमेंट्स बँकेसाठी डिपॉझिट आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शनची deposit and Credit Transaction deadline वाढवून मार्च 15 केली आहे, मात्र त्यानंतर Paytm पेमेंट्स बँक पूर्णपणे बंद होईल. म्हणून, या संधीचा लाभ घेऊन तुमचे सर्व व्यवहार लवकर पूर्ण करा आणि तुमचे पैसे दुसऱ्या बँकेत ट्रांसफर करा, यामुळे पुढे कोणतीही अडचण येणार नाही.
आधी सर्वोच्य बँककडून Paytm ला 29 फेब्रुवारी पर्यंत सर्व बँकिंग व्यवहार बंद करण्याचा आदेश देण्यात आला होता (Paytm News). कंपनीकडून आढळून आलेल्या काही त्रुटींमुळे सर्वोच्य बँकेने ही शिक्षा जनहितार्थ जारी केली होती आणि या कठोर निर्णयानंतर Paytm तसेच त्यांची पालक कंपनी One97 Communications यांच्या शेअर्समध्ये भरपूर घसरण झाली हे आपण सगळेच जाणतो. मात्र आज सर्वोच्य बँकने पेमेंट्स बँकेच्या खाते बंद करण्याची तारीख पुढे ढकलली आहे. लोकांना त्यांचे पैसे काढण्यासाठी आणि इतर व्यवहार पूर्ण करण्यासाठी थोडा अधिक वेळ मिळेल. पण लक्षात ठेवा, ही केवळ मुदतवाढ आहे, पूर्णपणे माफी नाही. त्यामुळे सतर्क राहा आणि वेळेत तुमचे व्यवहार पूर्ण करा.