Paytm News: Paytm नंतर बाकी फिनटेक कंपन्यांना फटका बसणार का?

Paytm News: Paytm पेमेंट्स बँक ही फिनटेक कंपनी आहे जिच्यावर RBI ची कारवाई सुरु आहे, मात्र लक्ष्यात घ्या की केंद्रीय बँकेकडून अनेक फिनटेक कंपन्यांवर KYC नियमांच्या उल्लंघनाबद्दल कारवाई करण्याचा विचार केला जात आहे. यामध्ये एक आघाडीची पेमेंट अग्रीगेटर आणि एक वॉलेट सेवा प्रदाता यांचा समावेश आहे. हे दोनही व्यवसाय कोणते याबद्दल आतापर्यंत माहिती उघड केली गेलेली नाही, परंतु त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. यामुळे फिनटेक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी KYC ही महत्वाची प्रक्रिया असते आणि या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होऊ शकते. या घटनेमुळे इतर कंपन्यांना दक्षता बाळगण्याचा इशारा आहे.

Paytmचा एकूण वाद काय आहे? (Paytm News)

31 जानेवारी रोजी, ग्राहकांची ओळख पडताळणी प्रक्रियेत त्रुटी आढळल्यामुळे रिझर्व्ह बँकेने Paytm पेमेंट्स बँकेवर नवीन ग्राहकांना नोंदणी करण्यावर बंदी घातली. या कारवाईनंतर, ED अर्थात प्रवर्तन संचालनालयाने Paytmच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली आणि त्यांच्याकडून कागदपत्र जप्त केल्याची बातमी समोर आली. या घटनेमुळे आर्थिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या मते, ग्राहकांची माहिती गोपनीय ठेवणे आणि फसवणूक टाळण्यासाठी योग्य ओळख पडताळणी प्रक्रिया महत्त्वाची असते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत बँकेला नवीन ग्राहकांना जोडण्यावर बंदी घातली आहे(Paytm News). ED ची कारवाई या प्रकरणाला आणखी गंभीर बनवते, कारण ED हे आर्थिक गुन्हेगारीविरुद्ध कारवाई करणारे प्रमुख संस्थान आहे. सध्या या प्रकरणाचा अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, यामुळे Paytm आणि त्याच्या ग्राहकांवर काय परिणाम होणार याकडे आता सर्वांचे लक्ष्य लागले आहे.