Paytm News: रिजर्व बँकेने (RBI) Paytm पेमेंट्स बँकेवर आणखी कडक कारवाई केली आहे, यामुळे Paytm द्वारे UPI पेमेंट करणारे ग्राहक थोडेसे त्रस्त होऊ शकतात. सर्वोच्य बँकने डिजिटल पेमेंट्सची देखरेख करणारी संस्था NPCI ला Paytm Handle दुसऱ्या नवीन बँकांमध्ये migrate करण्याचे निर्देश दिले आहेत, याचा अर्थ असा की paytm द्वारे UPI पेमेंट करणारे ग्राहक आता Paytm Payments Bank ऐवजी दुसऱ्या बँकेचा वापर करतील.
Paytm बाबत सर्वोच्य बँकचा नवीन नियम:(Paytm News)
देशातील सर्वोच्य बँकचे म्हणणे आहे की जर OCL (Other Current liabilities) ला TPAP दर्जा मिळाला तर Paytm ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय सहजपणे मायग्रेट करता येईल. सर्वोच्य बँकने NPCI ला Paytm ला UPI मध्ये TPAP बनण्याची परवानगी देण्यास सांगितले आहे. जर Paytm ला TPAP बनण्याची परवानगी मिळाली तर Paytmचा UPI हँडल (उदा. @paytm) असलेले ग्राहक सहजपणे इतर UPI ॲप्सचा वापर सुरु करू शकतील.
तुम्ही जर का Paytmचे वापरकर्ते असाल तर खालील मुद्दे पहा:
Settlement Account: Paytm चा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून Paytm पेमेंट सर्विस प्रोवाइडर दुसऱ्या बँकेसोबत सेटलमेंट अकाउंट उघडू शकते, यामुळे व्यापाऱ्यांना वेळोवेळी पैसे मिळत राहतील.
ग्राहकांचे वॉलेट: ज्या ग्राहकांचे वॉलेट Paytm सोबत आहे त्यांनी दुसऱ्या बँकेसोबत वॉलेट उघडण्याचा विचार करावा. RBI कडून हीच सूचना देण्यात आली आहे(Paytm News).
Fastag आणि NCMC कार्ड: Paytm Payment bank कडून जारी केलेले Fastag आणि NCMC कार्डधारकांनी 15 मार्च पर्यंत दुसरा पर्याय शोधून काढावा.