Paytm News: Paytm Payment Bank वर रिझर्व्ह बँकेने (RBI) केलेल्या कारवाईनंतर, Paytm ची मूळ कंपनी असलेल्या One97 Communications Ltd. ने स्थापन केलेल्या सल्लागार समितीला आत्तापर्यंत कोणतीही समस्या आढळलेली नाही, असे समितीचे प्रमुख आणि भारतीय Securities and Exchange Board चे (SEBI) माजी अध्यक्ष एम. दामोदरन यांनी PTI या वृत्तसंस्थेला सांगितले.
काय म्हणाले दामोदरन? (Paytm News)
माजी SEBI सहकाऱ्यांनी संकलित केलेल्या ‘‘The Turmeric Latte’’ या चरित्रात्मक पुस्तकाच्या प्रदर्शनादरम्यान डॉ. दामोदरन यांनी सांगितलं की, सध्या Paytm Bank वर रिझर्व्ह बँकेकडून (RBI) कारवाई सुरू आहे. “आम्ही बाह्य नियामक आहोत. या टप्प्यावर RBI शी व्यवहार करत आहेत.”
रिझर्व्ह बँकेने PPL वर कारवाई केल्यानंतर, Paytm ने या महिन्याच्या सुरुवातीला एम. दामोदरन यांच्या अध्यक्षतेखाली एक समुपदेशक समिती स्थापन करण्याची घोषणा केली. ही समिती अनुपालन आणि नियामनात्मक बाबींमध्ये मजबुती आणण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. मात्र, जेव्हा दामोदरनांना Paytm वर परिणाम होऊ शकणार्या समस्यांबद्दल विचार विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, ” याबद्दल वक्तव्य करण्यासाठी हा अगदीच प्राथमिक टप्पा आहे, आम्ही अजून काही मत व्यक्त करण्याच्या टप्प्यावर पोहोचलो नाही.”
या कमिटीमध्ये कोणाचा समावेश होतो?
Paytm च्या म्हणण्यानुसार, समितीमध्ये अनुभवी व्यावसायिकांचा समावेश होतो(Paytm News). यामध्ये भारतीय Charted Accountancy संस्थेचे (ICAI) माजी अध्यक्ष एम.एम. चितळे आणि रिझर्व्ह बँकेने नामनिर्देशित केलेले Banking Codes आणि Standard Board Of India चे माजी Governing Council सदस्य तसेच आंध्रा बँकेचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर. रामचंद्रन यांचा समावेश होतो.