Paytm News: ऑनलाइन पेमेंट कंपनी Paytmची बँकिंग शाखा असलेल्या Paytm Payments Bank वर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने केलेल्या कारवाईकडून इतर FinTech कंपन्यांनी धडा घायचा आहे. याबाबत केंद्रीय Electronic आणि IT राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, कायद्याचे पालन करणे हे कंपन्यांसाठी बंधनकारक आहे, ती तुमची इच्छा असू शकत नाही.
Paytmच्या घटनेबद्दल काय म्हणाले राज्यमंत्री? (Paytm News)
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी Paytm Payments Bank वर (PPBL) रिझर्व्ह बँकेने लादलेल्या बंदीबद्दल बोलताना म्हटले आहे की, ही कारवाई “उद्योजक नियमांचे पालन करत नाहीत” हे दाखवणारे एक प्रमुख उदाहरण आहे. केंद्र सरकारला वाटते की, Paytm बँकेने बँकिंग नियमांचे पालन केलेले नाही, त्यामुळेच त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. Paytmचं हेच उदाहरण हे इतर उद्योजकांसाठी एक धडा आहे, त्यांनी सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचा नेहमीच आदर करायचा असतो. मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, नियमांचं पालन करणं हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे.
देशातील सर्व कंपन्यांना त्या भारतीय असोत किंवा परदेशी, मोठ्या असोत किंवा लहान, नियमांचं पालन करणं हे सर्वांसाठी बंधनकारक आहे. नियमांचं पालन केल्याशिवाय कोणतीही कंपनी चालू शकत नाही. चंद्रशेखर(Paytm News) यांचं असं म्हणणं आहे की, RBIने Paytm वर केलेली कारवाई ही FinTech क्षेत्राला एक धडा आहे. कायद्याचे पालन करणं गरजेचे आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. RBI ची कारवाई FinTech क्षेत्राला नुकसानकारक नाही, त्यांचा हेतू FinTech कंपन्यांना कायद्याचे पालन करण्यासाठी जागरुक करणं हा आहे.