Paytm Payment Bank : रिझर्व बँकने का ठोठावला दंड? Paytm बँकेची नेमकी काय झाली चूक?

Paytm Payment Bank : रिझर्व बँक ऑफ इंडिया हि देशात चालेल्या सर्व आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळते, देशांत सुरु असलेल्या बँकिंग क्षेत्रात तिचे वर्चस्व कायम आहे, किंबहुना तीच सर्वांची कार्यकर्ती बँक आहे. कोणताही बँक किंवा आर्थिक संस्थांकडून झालेल्या चुकांसाठी त्यांना दंड देण्याचा अधिकार RBI ला असतो. आता Paytm साठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुरुवारी RBI ने Paytm बँकला (Paytm Bank) एकूण 5.39 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. KYC नियमांचे पालन त्यांच्याकडून न झाल्याने बँकने त्यांना हा झटका दिला आहे. आता बँकने असं का केलं या प्रश्नांची उत्तरं देणं बँकेला भाग आहे. नेमकं काय झालं प्रकरण आणि पेटीएम बँकच्या विरोधात RBI का खवळली हे प्रकरण थोडक्यात जाणून घेऊया…

RBI Paytm वर का खवळली? Paytm Payment Bank

Paytm बँकला RBI ने KYCच्या नियमांचे पालन न करण्याबाबत नोटीस पाठवली होती, त्याचे उत्तर बँककडून मिळताच RBIने KYCच्या नियमांचे पालन न केल्याचा आरोप सिद्ध करत बँकच्या विरोधात निष्कर्ष काढला आणि पेटीएम बँकला दंड ठोठावण्यात आला. हा दंड काही कमी नसून भला मोठा 5.39 रुपयांचा आहे. आपण घेतलेल्या निर्णयावर बोलताना RBI ने म्हटले आहे कि गुन्हा सिद्ध झाल्यामुळे पेटीएमच्या विरुद्ध बँकिंग नियम कायदा,1949 च्या कलम 46(4)(i)च्या अंतर्गत शिक्षा देण्यात आली आहे. या बाबतीत सर्व अधिकार घेण्याचा अधिकार देशातील सर्वोच्च बँक RBI कडेच असतो, आणि त्याचाच वापर करत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Paytm बँकचे शेअर्स असे काम करत आहेत:

पेटीएम बँकच्या शेअर्सनी जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यांपर्यंत 80 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. या बँकचे शेअर्स एका महिन्यात 11 टक्के तर एका आठवड्यात 7 त्याक्कांवर काम करत होते. पेटीएम बँकच्या(Paytm Bank) शेअर्सची म्युचुअल फंड्सनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली, म्युचुअल फंड्समुळे बँकचे स्टेक 2.79 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. रिझर्व बँक कडून कारवाई झालेली पेटीएम बँक हि एकाच नसून तिच्या बरोबरीने अजून दोन बँकांचा समावेश आहे, नियमांचे पालन न केल्यामुळे श्री वारणा सहकारी बँक व राज्य परिवहन सहकारी बँकला दंड देण्यात आला होता.