Paytm Payments Bank: Paytm कंपनीवर भीतीचे सावट कायम; 15 तारखेनंतर काय होणार?

Paytm Payments Bank: Paytm Payments Bank वर असलेली टांगतीची तलवार अजूनही कायम आहे. 15 मार्च नंतर RBI त्यांचा परवाना रद्द करू शकते. अशाप्रकरणी RBI नेमणूक केलेला प्रशासक बँकेत येऊन मालकी नसलेल्या ठेवी (Unclaimed Deposits) हाताळू शकतात आणि काही महत्त्वाच्या विभागांची देखरेख करू शकतात. असे झाल्यास, गेल्या दोन दशकांमध्ये RBI ची ही पहिली कठोर कारवाई असेल.

वाढत्या चिंतांनी कंपनीला घेरलं: (Paytm Payments Bank)

Paytm Payments Bank वर आर्थिक गुन्हेगारी रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी आर्थिक गुप्तचर युनिटाने 23 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. याशिवाय बँकेचे अंशकालीन गैर-कार्यकारी अध्यक्ष विजय शेखर शर्मा यांनीही या आठवड्याच्या सुरुवातीला राजीनामा दिला आहे. आता बँकेची पुनर्रचना करण्यात आली असून प्रशासक नेमण्यात आलय. या प्रशासकाची भूमिका अत्यंत महत्वाची असेल कारण तो बँकेत जमा असलेल्या रकमेच्या दाव्यांवर लक्ष ठेवणार असून जमाकर्तेांना त्यांची रक्कम परत मिळवून देण्याची प्रक्रिया राबवणार आहे.

सदर कारवाईवर कंपनीचे म्हणणे काय?

दोन वर्षांपूर्वी बंद केलेल्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या चुकांमुळे हा दंड आकारला असल्याचे Paytm Payments Bank च्या प्रवक्त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “या कालावधीनंतर, आम्ही आर्थिक गुप्तचर युनिट (FIU) ला माहिती देण्याच्या आमच्या देखरेखी प्रणाली आणि यंत्रणांमध्ये सुधारणा केली आहे.”