Paytm Share Price: Paytm पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बंदी घातल्यानंतर Paytm च्या अडचणी वाढत आहेत. महत्वाची बाब म्हणजे केवळ गेल्या 24 तासांत Paytm ला तीन मोठे धक्के बसले आहेत. EPFO ने Paytm पेमेंट बँकेत क्रेडिट आणि क्लेम सेटलमेंटवर बंदी घातली आहे, याचा अर्थ असा की EPFO सदस्यांना आता Paytm पेमेंट बँक खात्याद्वारे PF क्लेम सेटलमेंट किंवा पैसे जमा करणे शक्य होणार नाही, या सर्व अडथळ्यांमुळेच Paytm च्या शेअर्समध्ये आजही मोठी घसरण दिसून आली.
Paytm समोरच्या तीन मोठ्या समस्या कोणत्या? (Paytm Share Price)
भारतीय रिझर्व्ह बँकेने Paytm पेमेंट बँकेवर बंदी घातल्यानंतर, EPFO ने म्हटले आहे की ते ग्राहकांचे पैसे या बँकेच्या खात्यांमध्ये हस्तांतरित करणार नाहीत. EPFO 8 फेब्रुवारी 2024 पासून Paytm पेमेंट बँक खात्यांमध्ये EPF ठेवी आणि क्रेडिट व्यवहारांवर बंदी घातलीये. सोबतच EPFO ने त्याच्या क्षेत्रीय कार्यालयांना 23 फेब्रुवारी 2024 पासून Paytm पेमेंट बँक खात्यांशी संबंधित दावे स्वीकारू नयेत असे निर्देश दिले आहेत.
Paytm या डिजिटल पेमेंट कंपनीला दुहेरी धक्का बसला कारण एका बाजूला कंपनीच्या स्वतंत्र संचालक मंजू अग्रवाल यांनी राजीनामा दिला, तर दुसरीकडे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. मंजू अग्रवाल यांनी 1 फेब्रुवारी रोजी तत्काळ कंपनीच्या पदावरून राजीनामा दिला आणि शुक्रवारी शेअर बाजार उघडताच Paytm च्या शेअर्समध्ये 7.52% घसरण झाली. गेल्या दोन दिवसांत शेअर्स 17 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत, तर एका महिन्यात कंपनीचे शेअर्स 39.76% ने घसरले आहेत.
31 जानेवारी रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घातली होती. या बंदीमुळे 29 फेब्रुवारीनंतर बँकेला कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात ठेव, क्रेडिट, प्रीपेड, वॉलेट, फास्टॅग इत्यादी व्यवहार किंवा टॉप-अप करण्याची परवानगी नाही, या बंदीमुळे पेटीएमला मोठा धक्का बसला आहे आणि त्याचे शेअर्स (Paytm Share Price) सतत घसरत आहेत.