Paytm Shares: Paytmच्या शेअर्स पुन्हा घसरले; गुंतवणूकदारांचे 26,000 कोटींचे नुकसान

Paytm Shares: देशातील सर्वात मोठी ऑनलाइन पेमेंट कंपनी Paytm, हीच्या पालक कंपनी One 97 Communications Limited च्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. फक्त 10 दिवसांत गुंतवणुकदारांना जवळपास 26,000 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. असं म्हणतात की Paytm च्या शेअर्समध्ये ही घसरण किराणा दुकानांनी Paytm ला पेमेंटसाठी स्वीकारणे बंद केल्यामुळे झालीये. याव्यतिरिक्त, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पेमेंट बँकवर आपले रुख बदलण्यास नकार दिला असल्याने याचा परिणाम One 97 Communications च्या शेअर्सवर झालेला पाहायला मिळतोय.

Paytmचे शेअर्स घसरले:

आज म्हणजेच बुधवारी, हा शेअर जवळपास 9 टक्क्यांपर्यंत घसरला आणि BSE वर तो 344.90 पर्यंत खाली आला. RBI कडून बंदीची घोषणा झाल्यापासून 10 बाजारी दिवस उलटून गेले आहेत आणि या काळात या शेअरने त्याच्या मूल्याच्या जवळपास 55 टक्के गमावले आहेत(Paytm Shares). बाजारपेठेच्या भांडवलाच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास, ते जवळपास 26,000 कोटी एवढे झाले आहेत. 11.45 वाजता, कंपनीचा शेअर -7.19 टक्क्यांच्या घसरणीसह 353.00 वर ट्रेड करत होता.

याचा परिणाम काय होईल? (Paytm Shares)

RBI ने Paytm Payments Bank ला नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी घातली कारण बँकेने डेटा सुरक्षा आणि KYC नियमांचे उल्लंघन केले होते, यामुळे Paytm च्या व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात Paytmच्या शेअरच्या किंमतीत आणखी घसरण होऊ शकते.