Paytm Shares: अनेक दिवसानंतर Paytm साठी आनंदाची बातमी; 6 टक्के शेअर वाढीचं कारण काय?

Paytm Shares: Paytm शेअर्समध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली घसरण मंगळवारी थांबली. RBIने बँकिंग सेवांवर बंदी घातल्यानंतर तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये फिनटेक कंपनीचे शेअर्स 43 टक्क्यांनी घसरले होते. मात्र, आज म्हणजेच मंगळवारी सकाळी शेअर बाजार सुरू होताच Paytmच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आणि दिवसाअखेरपर्यंत One97 Communicationsच्या शेअरमध्ये 6 टक्क्यांची वाढ झालेली पाहायला मिळाली. मंगळवारी झालेली वाढ ही गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक ठरली आहे. Paytm ने नुकतेच RBI ला दिलेल्या आश्वासनांमुळे आणि कंपनीच्या भविष्यातील वाढीच्या संभाव्यतेमुळे ही सकारात्मक चिन्हे दिसत असल्याचे मानले जात आहे.

Paytm शेअरमध्ये अचानक वाढ का? (Paytm Shares)

आज सकाळी शेअर बाजार उघडताच Paytm ची मूळ कंपनी One97 Communications च्या शेअरमध्ये 395 रुपयांपर्यंत वाढ झाली. या वाढीमागे अनेक कारणे असू शकतात. जसं की कंपनी संकटातून जात असतानाही, CEO विजय शेखर शर्मा यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले आश्वासन आणि कंपनी पुन्हा एकदा यशस्वी होईल असा दिलेला विश्वास. या आश्वासनांमुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर सकारात्मक परिणाम झाला. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जिओ फायनान्सियल सर्व्हिसेस (JFSL) ला Paytm चा वॉलेट व्यवसाय विकण्याची बातमी नुकतीच चर्चेत आली होती आणि यानंतर, दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत लगेच वाढ झालेली पाहायला मिळाली.

RBI ने Paytm पेमेंट बँकेवर बंदी घातली!

3 जानेवारी 2024 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने Paytm पेमेंट बँकेवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला. या बंदीमुळे 29 फेब्रुवारी 2024 पासून Paytm पेमेंट बँक खालील गोष्टी करू शकणार नाही. RBI ने बंदी घालण्यामागे अनेक कारणे दिली आहेत यामध्ये बँकेच्या कामकाजातील अनियमितता, सिस्टम ऑडिट रिपोर्ट (System Audit Report) आणि त्यानंतरच्या काही रिपोर्टमध्ये कंपनीने सातत्याने RBIच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा समावेश होतो. या बंदीमुळे Paytmपेमेंट बँकेच्या 6.4 कोटी ग्राहकांवर परिणाम होईल, तसेच ते आता नवीन ठेवी जमा करू शकणार नाहीत किंवा FASTag रिचार्ज करू शकणार नाहीत(Paytm Shares). Paytmने म्हटले आहे की ते RBI सोबत सहकार्य करत आहेत आणि लवकरच बंदी उठवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलतील.