Paytm Shares: Paytmचे शेअर्स पोहोचलेत अप्पर सर्किटवर; आहात कुठे?

Paytm Shares: देशातील सर्वात मोठी ऑनलाइन पेमेंट कंपनी Paytmच्या शेअर्सवर आज अपर सर्किट लागला. बाजारात घसरण होत असतानाही Paytmच्या शेअर्समध्ये लगातार दुसऱ्या दिवशी तेजी आली. बुधवारी ते 5 टक्क्यांनी वाढले आणि 10 टक्क्यांच्या अपर सर्किटला स्पर्श केला. लक्ष्यात घ्या Paytmच्या शेअरने अपर सर्किटला स्पर्श ही पहिलीच वेळ आहे. अशाप्रकारे दोन दिवसात कंपनीच्या 15 टक्क्यांची वाढ झाली. गेल्या आठवड्यात RBI ने Paytm वर अनेक निर्बंध लादले होते, व यामुळे Paytm ची मूळ कंपनी One97 Communications Limited च्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती.

Paytm च्या शेअरमध्ये तेजी येण्याचं कारण काय?

गुरुवारी, Paytm चे शेअर्स 10 टक्क्यांनी वाढून 496.75 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले. RBI ने मार्चपासून पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सर्व सेवांवर बंदी घातली आहे. RBIच्या आदेशानुसार, आता वापरकर्त्यांना केवळ पैसे हस्तांतरित करण्याची परवानगी दिली गेली आहे, पण 29 फेब्रुवारी पासून वापरकर्ते आपलं वॉलेट किंवा फास्टैग रिचार्ज करू शकणार नाहीत. तसंच खात्यात पैसे जमा करणंही शक्य होणार नाही.

काही दिवसांपूर्वी कंपनीचे मालक शर्मा यांनी वापरकर्त्यांना आश्वासन दिलं की त्यांचं पैसे सुरक्षित आहेत आणि 29 फेब्रुवारी नंतरही Paytmचं ॲप सामान्यपणे काम करत राहील, त्यानंतर आज पुन्हा एकदा मोठी कामगिरी बजावत कंपनीचे मालक म्हणजेच शर्मा यांनी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि त्यांच्या 10 मिनिटांनसाठी काही चर्चा झाली, आणि असं म्हणतायत की याच बैठकीनंतर कंपनीच्या शेअर्सना लागलेली उतरतीकळा संपली आहे (Paytm Shares).