Paytm Shares: आजच्या बाजारात देखील Paytmच्या शेअर्सची तेजी कायम राहिली आहे आणि त्यामुळे त्यांच्या शेअर्स खरेदी करण्याची मोठी स्पर्धा पाहायला मिळली. गेल्या दोन दिवसांपासून Paytmचे शेअर्स वरच्या सर्किटवर तेजीत आहेत. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी, Paytmची मूळ कंपनी One97 Communicationsच्या शेअरमध्ये बाजार सुरू होताच 5 टक्क्यांची वाढ झाली. शेअर्सच्या वाढीमुळे कंपनीचे मार्केट कॅप देखील वाढले आहे.
RBI च्या कारवाईनंतर Paytmचे शेअर्स वाढले: (Paytm Shares)
रिझर्व्ह बँकेने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घातल्यावर, पेटीएमची मूळ कंपनी One97 Communicationsच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. पण गेल्या दोन दिवसांत मात्र, One97 च्या शेअरमध्ये चांगली वाढ झाली आहे. सोमवारी शेअर बाजार बंद झाल्यावर त्यात 5 टक्क्यांची वाढ झाली होती आणि मंगळवारीही Paytm चा शेअर पुन्हा 5 टक्क्यांनी वाढून 376.25 रुपयांवर पोहोचला.
अगोदर पेमेंट कंपनी पेटीएमचे मार्केट कॅप जवळपास 50 टक्क्यांनी घसरले होते, आकडे पाहायचे झाल्यास 48,310 कोटी रुपयांवरून घसरून ते 22,760 कोटी रुपयांपर्यंत आले होते. पण सोमवारी त्यात वाढ झाली आणि नवीन किंमत 23,900 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. मंगळवारीही ही वाढ कायम राहिली असून मार्केट कॅप 23,900 कोटी रुपयांवर स्थिरावले आहे.
Paytm च्या शेअर वाढीचं कारण तरी काय?
पेमेंट बँकेच्या सेवांवर बंदी घालण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाची मुदत वाढवण्याचा आणि कंपनीचे मुख्य खाते Axis Bank कडे हलवण्याचा परिणाम दिसून आला, त्यामुळे पेटीएमच्या शेअर्समध्ये वाढ झाली(Paytm Shares). या वाढीमागे आणखी एक कारण म्हणजे परदेशातून आलेल्या चांगल्या बातम्या, बर्नस्टीन या परदेशी ब्रोकरेज कंपनीने या शेअरबद्दल सकारात्मक बाब व्यक्त केली आहे.